Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 4 नगरसेवकांनी सोडली साथ, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश
Top News

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 4 नगरसेवकांनी सोडली साथ, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

Uddhav Thackeray | राज्यात राजकारणातून मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेना उबाठा (ठाकरे गट) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या 4 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडली आहे. या चारही नेगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत (Shivsena) पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – होर्मुज खाडीत युद्धाचा भडका! अमेरिकेने इराणवर केला सर्वात मोठा बॉम्ब हल्ला, तणाव शिगेला

अकोल्यात नगरसेवकांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ

अकोल्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अकोला महापालिका निवडणुकीचा निकाल लागला होता. या निकालानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. अकोला महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांनी ठाकरेंना रामराम करत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत ते 4 नगरसेवक?

अकोला महापालिका निवणूकीत ठाकरे गटाचे मनोज पाटील, सोनाली सरोदे, सुरेखा काळे आणि सागर भारूका हे चारही उमेदवार निवडून आले होते. तर ठाकरे गटाच्या तिकिटावर विजय मिळवलेल्या या चारही नगरसेवकांनी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. शिवसेनेचे नेते चंद्रशेखर पांडे गुरूजी यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. धक्कादायक बाब म्हणजे चारही नगरसेवकांसोबत एका जिल्हाध्यक्षाने देखील ठाकरेंची साथ सोडली आहे.

ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनी देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे अकोल्यातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे ठाकरेंची साथ का सोडली? याबाबत नरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “संपूर्ण शहराचा आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहराच्या समस्या सोडवण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे”, अशी भूमिका नगरसेवकांनी स्पष्ट केली.

दरम्यान, काल (17 मार्च) माध्यमांनी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंना विधान परिषद निवडणुकीत मदत करणार का? असा सवाल विचारला. त्यावर एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केले. जर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला विधान परिषद निवडणुकीसाठी फोन केला तर मदत करणार का? असा प्रश्न पत्रकरांनी विचारला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “आत्ताच राज्यसभेची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे जेव्हा विधानपरिषदेची निवडणूक येईल तेव्हा बघू”, असं मिश्किलपणे एकनाश शिंदेंनी उत्तर दिलं. शिंदेंनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे ते उद्धव ठाकरेंना मदत करणार की नाही? असा सवाल सध्या निर्माण झाला आहे.

लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. तर या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून यावे, अशी इच्छा ठाकरे गटाची आहे. अशातच आता ठाकरेंना मदत करण्याबाबत एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts