Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • इराण युद्धाचा भारतीय औषध बाजाराला फटका; औषधांपासून सर्जिकल वस्तू महागणार
Top News

इराण युद्धाचा भारतीय औषध बाजाराला फटका; औषधांपासून सर्जिकल वस्तू महागणार

medicine expensive

Iran War Hits India’s Pharmaceutical Market : अमेरिका, इस्त्राईल- इराण युद्धाच्या (America, Israel–Iran War) मोठा फटका भारताला बसताना दिसून येत आहे. या युद्धाचा परिणाम (iran war) औषध बाजारावरही (Pharmaceutical Market) जाणवू लागला आहे. त्यामुळे तापाच्या औषधांपासून सर्जिकल वस्तू महागणार (Medicine prices are set to rise) असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. औषधे आणि सर्जिकल वस्तूंच्या किमतींमध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची भीती औषध व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीय. औषध निर्मितीत वेगवेगळ्या आवश्यक कच्या मालाचा वापर केला जातो. त्यात रासायनिक घटक  प्लास्टिक आणि अॅल्युमिनियमच्या किंमती वधारल्या आहेत. याचा थेट परिणाम औषध कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर  होत असल्याचे औषध निर्यातदार व उत्पादकांचे म्हणणे आहे. किंमती वधारल्याने कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे. त्याचा थेट परिणाम औषधांच्या किंमतीवर झालाय.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 4 नगरसेवकांनी सोडली साथ, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

पॅरासिटामॉलच्या कच्च्या मालाची किंमत ४७ टक्कयांनी वाढली

मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलच्या कच्च्या मालाची किंमत ४७ टक्कयांनी वाढली. वेदनाशामक डायक्लोफेनॅकमध्ये ५४ टक्के, डायक्लोफेनॅक पोटॅशियममध्ये ३३ टक्के वाढ झाली आहे. अँटिबायोटिक्सदेखील यातून सुटलेले नाहीत.अमॉक्सिसिलिन ट्रायहायड्रेटच्या किमतीत ४५ टक्के, आणि सिप्रोफ्लोक्सासिनमध्ये  सुमारे ६२ टक्के,वाढ झाली आहे.

कच्चा माल आणि पॅकेजिंग खर्च वाढला

कच्च्या मालापासून ते औषधांच्या पॅकेजिंगपर्यंत सर्व खर्च वाढल्यामुळे औषधे आणि सर्जिकल वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या साठ्यातील औषधांवर याचा परिणाम दिसू शकतो. काही व्यापाऱ्यांनी आधीच औषधे आणि सर्जिकल वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत, परंतु असे होऊ नये. जुन्या साठ्यातील औषधे आणि सर्जिकल वस्तू पूर्वीच्या किमतीतच विकल्या जाव्यात, असे औषध उत्पादक आशीष ग्रोवर (Ashish Grover) म्हणाले.

औषधांच्या किंमती वाढणार असल्याने सर्वसामान्यांना फटका

युद्धाच्या झळा यामुळे औषधांच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे आधीच महाघाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे. परिणामी औषधे कशी खरेदी करायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. आजच्या घडीला जगणे मुश्किल झालं असताना औषधांच्या किंमती वाढणार असल्याने मोठी समस्या निर्माण झालीय. यावर केंद्र सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्यांना नागरिकांकडून केली जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts