• Home
  • राजकारण
  • महिलांवर अत्याचार अन् बलात्कार; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषी अशोक खरातला ठोकल्या बेड्या; पोलिसांना सापडले 58 व्हिडीओ
Top News

महिलांवर अत्याचार अन् बलात्कार; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषी अशोक खरातला ठोकल्या बेड्या; पोलिसांना सापडले 58 व्हिडीओ

ashok kharat

Astrologer Ashok Kharat Arrested | नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अशोक खरातला (Astrologer Ashok Kharat) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजकीय नेते, मोठे उद्योजक आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषी अशोक खरातच आता खरे पितळ उघडे पडले आहे. एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार आणि बलात्कार केल्याप्रकरणी अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – इराणचे टेन्शन वाढले! इस्त्रायलने आक्रमक होत दिली मोठी धमकी, म्हणाले, “मोजतबा खामेनेईंना शोधून…”

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अशोक खरातला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ज्योतिषी अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आरोपी अशोक खरातचे अनेक काळे कारमाने समोर आले आहेत, ज्यामुळे पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे.

पीडित महिलेने नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरूद्ध तक्रार दाखल केली होता. पीडितेच्या तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी सापळा रचून बुधवारी (18 मार्च) अशोक खरातला आपल्या ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या. पहाटे 3 वाजता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ज्योतिषी व्यवसायाच्या नावाखाली नराधम अशोक खरात हा अनेकांची फसवणूक करत त्यांना गंडा घालत होता. तर त्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याची माहिती देखील समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

खरातकडे असलेल्या पेनड्राईव्हमध्ये पोलिसांना काय आढळलं?

पोलिसांनी अशोक खरातकडे असलेल्या एक पेनड्राईव्ह देखील जप्त केला आहे. या पेनड्राईव्हमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. हे व्हिडीओ नेमके कोणाचे आहेत आणि अशोक खरात या व्हिडीओंचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करत होता का? याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. त्याने आत्तापर्यंत 154 देशांचा दौरा केला असल्याचा दावा केला जात आहे. तसेच तो मोठा अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात अनेक बडे राजकीय नेते, उद्योजग होते. यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भविष्य सांगितलं होतं.सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या ‘श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’चा खरात अध्यक्ष आहे. तर एकनाथ शिंदेंनी नोव्हेंबर 2022 मध्ये त्याच्या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांने शिंदेंचं भविष्य सांगितलं होतं.

अशोक खरातने मर्चंट नेव्हीतील आपल्या अनुभवाचा आणि 154 देशांचा दौऱ्यादरम्यान केलेला अभ्यास याचा वापर करून तो लोकांचा विश्वास संपादन करत होता. त्यामुळे त्याच्याकडे अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योजक येत होते. अशातच आता अशोक खरातचा खरा चेहरा समोर आला असून राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts