Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आयपीएल २०२६ : मुंबई इंडियन्स संघात दिग्गजांचा सुकाळ, ५ वर्षापासून विजेता पदाचा दुष्काळ
Top News

आयपीएल २०२६ : मुंबई इंडियन्स संघात दिग्गजांचा सुकाळ, ५ वर्षापासून विजेता पदाचा दुष्काळ

Mumbai Indians IPL News

IPL 2026 Tournament : बहुचर्चित आयपीएल २०२६ स्पर्धेला (IPL 2026 Tournament) २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. यंदा सर्वच संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानलं जात आहेत. मुंबई इंडियन्स संघात  (Mumbai Indians team) दिग्गज खेळाडूंचा भरणा (Senior Players Included) असून मागील ५ वर्षापासून चाहत्यांच्या पदरी निराशा पडलीय. मुंबई इंडियन्स संघानं शेवटचं जेतेपद २०२० मध्ये मिळवलंय. त्यानंतर तब्बल पाच वर्षापासून जेतेपदाचा (No championship title for five years) दुष्काळ आहे. त्यामुळे प्रेक्षकांची घोर निराशा झाला आहे. यंदा मात्र, मुंबई इंडियन्स प्रेक्षकांच्या अशा उंचावल्या आहेत. त्यामुळे मुंबईल आपल्या गमावलेल्या जल्वा पुन्हा दाखवून देणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – डोळ्याचं पाते लवते न लवते तोच निकाल! 2 मिनिटांत प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सिकंदरने जिंकली 2 लाखांची कुस्ती

हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स संघ टॉप ४ मध्ये होता. मात्र, प्रेक्षकांच्या उंचावलेल्या असा एलिमिनेटर फेरीतच लयास गेल्या. त्यानंतर गेल्या एक वर्षापासून प्रेक्षक पुन्हा एकदा संघाची कामगिरी पाहाण्यासाठी आणि जेतेपदाचा मानकरी ठरलं, अशा आशा लागल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यासारखी तगडी फलंदाजी आहे. या सर्व खेळाडूंकडे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद आहे.

मुंबई इंडियन्स संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश

तसेच संघात असलेला दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डिकाॅक हा देखील सध्या चांगल्या फाॅर्मात आहेत. रियान रिकल्टन, कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स हे देखील चांगल्याच फॉर्मात आहेत. त्यामुळे पुढील संघांची दाणादाण उडणार आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा काही प्रश्नच येत नाही. मुंबई इंडियन्सचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात आणि धावांचा पाठलाग करण्यात कमी पडणार अशा अपेक्षा प्रेक्षकांना आहेत.

जसप्रीत बुमराह असल्याने हुकूमाचा एक्का संघात

गोलंदाजीत तर मुंबई इंडियन्सकडे हुकूमाचा एक्का आहे. जसप्रीत बुमराह असल्याने चार षटकांचा खेळ मुंबईच्या हातात आहे. त्याचबरोबर शार्दुल ठाकुर, ट्रेंट बोल्ट आणि दीपर चहर हे देखील गोलंदाजीत साथ देणार आहेत. कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीत योगदान देणार हे काय नव्याने सांगायला नको. इतकंच काय तर फिरकीतही मुंबईचा संघ तगडा दिसत आहे. अल्लाह गझनफर आणि मिचेल सँटनरसारखे स्टार फिरकीपटू आहेत. पर्याय म्हणून मयंक मार्केंडेय आणि रघु शर्मा आहेत.

प्लेइंग ११ निवडणं आव्हानात्मक असणार

मुंबई इंडियन्स सर्वच बाबतीत तगडी दिसत आहे. पण असं असताना प्लेइंग ११ निवडणं आव्हानात्मक असणार आहे. कारण प्लेइंग ११ मध्ये ४ विदेशी खेळाडू असणार आहे. आयपीएल नियमानुसार, जास्तीत जास्त ४ विदेशी खेळाडूंची निवड प्लेइंग ११ मध्ये करता येईल. मुंबईकडे शेरफेन रूदरफोर्ड, गजनफर, कॉर्बिन बॉश, मिचेल सँटनर, रियान रिकल्टन, ट्रेंड बोल्ड, विल जॅक्स आणि क्विंटन डिकॉक आहे. यापैकी कोणत्या चार खेळाडूंची निवड करायची असा प्रश्न असणार आहे. शेरफेन रदरफोर्ड, कॉर्बिन बॉश, रियान रिकलटन, विल जॅक्स आणि क्विंटन डी कॉक हे फॉर्मात आहेत. यापैकी कशी निवड करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts