pimpri-chinchvad accident : लेह-लडाख, काश्मिरला (leh-ladakh-kashmir) फिरण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तीन तरुणांना (three friend) भीषण अपघातात काळाने गाठले. त्यांचा राजस्थानमधील कोटा (rajasthan kota)येथे दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. बुधवारी, सकाळी ही घटना घडली. या अपघातात कुणाल चोरडिया (२५, रा. चिंचवडगाव), मयुरेश पाडाळे (२३, रा. म्हाळुंगे) आणि सिद्धांत आल्हाट (२१, रा. थेरगाव) अशी मृतांची नावे आहेत. केथून पोलिस ठाण्याचे अधिकारी मनोज सिंह सिकरवार यांनी याबाबत माहिती दिली.
हे ही वाचा: मनसे मेळाव्यात राज ठाकरे फोडणार डरकाळी; राजकीय रणशिंग फुंकत कोणावर साधणार निशाणा?
कारचा चक्काचूर
२७ तारखेला हे तीन तरुण फॉर्च्यूनर कारमधून लेह लडाख, काश्मिरमध्ये सहलीला गेले होते. परतीच्या प्रवासात राजस्थानमधील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.या अपघातामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे. तरुणांचा एक ग्रुप फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेला होता. तीन कारमधून ते फिरायला गेले होते. पर्यटन करून ते घरी परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कार पुलावरून ३० फूट खाली कोसळली. यात कारचा चक्काचूर झाला. कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच मनोज सिंह सिकरवार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करून मदत केली. तिघांचे शवविच्छेदन झाले असून, नातेवाईक तिथे पोहोचले आहेत. हा अपघात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मतदारसंघात घडली आहे. त्यांच्या सचिवाशी माझी चर्चा झाली आहे. तिघांचे मृतदेह गुरुवारी शहरात आणण्यात येतील, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली
मृतदेह पिंपरी-चिंचवडमध्ये आणणार
कारगिल येथे हे तरुण आठ दिवसांपूर्वी पाच दिवस अडकले होते. बर्फवृष्टी झाल्याने सर्व रस्ते बंद होते. त्यावेळीही त्यांचा फोन आला होता. ‘बीएसएफ’च्या कमांडरशी संवाद साधून या तरुणांना तेथून सोडले होते, असेही खासदार बारणे यांनी सांगितले. आमदार शंकर जगताप म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना मी घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी मदत करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. मृतदेह विमानाने पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यासाठी आवश्यक ती मदत करणार आहेत.
नशीब बलवत्तर म्हणून एकजण वाचला
पर्यटनस्थळी फिरत असलेल्या तरुणांपैकी एकाला मंगळवारी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तो तातडीने विमानाने घरी निघून आला होता. तो ज्या कारमधून पर्यटनस्थळी प्रवास करत होता त्याच कारच्या अपघाताची माहिती समजली आणि संबंधित तरुणाला धक्का बसला.












