Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

प्रीलिम्स क्लिअर? आता DAF भरणे बंधनकारक, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

UPSC DAF 2026
UPSC DAF 2026: संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) मुख्य परीक्षा २०२६ साठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म (DAF) भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२६ च्या मुख्य परीक्षेसाठी (Mains) आवश्यक असलेल्या डिटेल्ड अँप्लिकेशन फॉर्म (DAF) भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्राथमिक परीक्षेत यश मिळवलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी आपली पात्रता निश्चित करण्यासाठी हा फॉर्म वेळेत भरून सादर करणे आवश्यक आहे.

प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार मुख्य परीक्षेची तयारी करत असताना आवश्यक औपचारिकता पूर्ण करू शकतात. आयोगाने हे स्पष्ट केले आहे की, मुख्य परीक्षेत बसण्यासाठी डीएएफ (DAF) भरणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ जून, २०२६ निश्चित करण्यात आली आहे. वेळेत अर्ज न करणारे उमेदवार मुख्य परीक्षेत सहभागी होऊ शकणार नाहीत.

हेही वाचा: धाराशिवच्या राजकारणात खळबळ! ओमराजेंच्या भूमिकेवर नवे प्रश्न उपस्थित

DAF का महत्त्वाचा आहे?

DAF हा केवळ अर्ज नसून उमेदवाराच्या शैक्षणिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक माहितीचा सविस्तर दस्तऐवज आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, सेवा प्राधान्यक्रम, वैयक्तिक तपशील आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागते. मुलाखतीच्या टप्प्यावरही या फॉर्ममधील माहितीचा संदर्भ घेतला जातो.

मुख्य परीक्षेपूर्वीची आवश्यक पायरी

प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना DAF भरून आपली उमेदवारी निश्चित करावी लागते. मुख्य परीक्षा ऑगस्ट 2026 मध्ये होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी तयारीसोबतच प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

DAF सादर करण्यासाठी 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

प्रवेशपत्रासाठी DAF अनिवार्य

मुख्य परीक्षेचे ई-प्रवेशपत्र केवळ DAF यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांनाच उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नये आणि अधिकृत सूचनांवर नियमित लक्ष ठेवावे.

UPSC कडून प्रसिद्ध होणाऱ्या पुढील सूचना, परीक्षा वेळापत्रक आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देणे आवश्यक आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts