Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शिंदे गटाची ताकद वाढली; सहा खासदारांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ताज्या बातम्या

शिंदे गटाची ताकद वाढली; सहा खासदारांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Six MPs Officially Join Eknath Shinde Shiv Sena Group

Six MPs Officially Join Eknath Shinde Shiv Sena Group: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी घडली असून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी संबंधित सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी महत्वाची घडामोडी घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी संबंधित सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या नेत्यांनी पक्षाचा झेंडा स्वीकारत आपल्या नव्या राजकीय प्रवासाची घोषणा केली.

हेही वाचा: प्रीलिम्स क्लिअर? आता DAF भरणे बंधनकारक, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

६ खासदार कोण आहेत?

पक्षप्रवेश करणाऱ्या खासदारांमध्ये संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, जय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. या प्रवेशामुळे आगामी राजकीय सामीकारणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून या निर्णयाकडे महत्वाच्या राजकीय बदलाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात दाखल झालेल्या खासदारांचे स्वागत केले. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून विचारांवर आधारित कुटुंब असल्याचे त्यांनी नमूद केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

२०२२ नंतर आता दुसरा टप्पा

शिंदे यांनी २०२२ मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करताना सांगितले की, राज्यातील विविध भागांतून अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेशी जोडले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांचा पक्षावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी काळात पक्ष संघटनात्मकदृष्ट्या आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

महत्वाची घडामोडी

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे राज्यातील विरोधी पक्षांमध्येही हालचाली वाढण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शिवसेनेच्या राजकीय बळकटीसाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts