• Home
  • महाराष्ट्र
  • ब्रेकिंग न्यूज! वाद-आरोपांनंतर अखेर रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Top News

ब्रेकिंग न्यूज! वाद-आरोपांनंतर अखेर रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

rupali chakankar

Rupali Chakankar Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिला असल्याची बातमी सध्या समोर येत आहे. काही काळापासून विरोधकांसह पक्षातीलच एका गटाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.

अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर वादात सापडल्या होत्या. या प्रकरणानंतर त्यांनी आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि आता अखेर महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडले आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट करताना सांगितले की, अशोक खरातशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरप्रकारात त्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी केली आहे.

दरम्यान, अशोक खरातवर शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असून त्याच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. खरातसोबतचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर टीका मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच त्या त्यांना आपला मार्गदर्शक मानत असल्यामुळे पूर्वी काही प्रकरणांत त्यांनी हस्तक्षेप केल्याचेही आरोप समोर आले होते.

https://x.com/ChakankarSpeaks/status/2037568187622146538?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2037568187622146538%7Ctwgr%5Ec1951300d09ff047e54174167954b5391ed54756%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmumbai%2Frupali-chakankar-resignation-ncp-womens-state-president-ashok-kharat-case-nashik-1417930

या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांसोबतच राष्ट्रवादीतील काही नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. वाढत्या दबावामुळे त्यांनी दोन्ही महत्वाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.

याशिवाय, अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टशी त्यांचा संबंध असल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून ट्रस्टच्या संचालकांचीही चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काळात चाकणकर यांच्यावरही तपासाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts