Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

सावधान…! राज्यात उद्यापासून गारपीट

garpit

Unseasonal Rain and Hailstorm: राज्यात ३० व ३१ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपीट होऊ शकते असा इशारा भारतीय हवामान खात्याने (indian weather department) दिला आहे. त्यामुळे शेतकऱयांनी सतर्क राहावे असे कृषी खात्याने (agriculture department) बजावले आहे.

हे ही वाचा: रुपाली चाकणकर यांच्याभोवतीचा फास आवळला? विशेष तपास पथकाकडून समन्स?

शेतीचे मोठे नुकसान होणार

सध्या राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. अशी परिस्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हात तोंडाशी आलेले पीक वाया जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे. तर राज्याच्या दक्षिण भागात वादळी-वाऱयासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याची आहे. हा पाऊस कर्नाटक, तेलंगणा नजिक असलेल्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या भागात पडू शकतो. परिणामी शेतकऱयांनी याला सामोरे जाताना सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करायला हवी. कारण उभे पीक आडवे झाल्यास शेतकऱयांनी करायचे काय? असाही सवाल केला जात आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून हा पाऊस पडल्यास शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते.

रब्बी पिकांचा हंगाम

काही दिवस राज्यात सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी अवकाळी पाऊस. एवढेच नाही तर काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडलेला आहे. परिणामी पीक वाया गेले आहे. सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरु आहे. अवकाळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची अशा भावना शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत.

शेती आतबट्याची बनतेय

भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारताची अर्थवव्यस्था शेतीवर आहे. मात्र शेती आज नुकसानीत आहे. कारण शेतीसाठी काढलेले कर्ज व त्यात सावकाराचा तगादा या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. परिणामी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे शेतकऱयांना मृत्यूला कवटाळावे लागते. या शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने पावले उचलायला हवीत, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts