Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • दिल्लीच्या राजकारणात खळबळ! खासदार राघव चड्ढांना आम आदमी पार्टीकडून मोठा झटका
Top News

दिल्लीच्या राजकारणात खळबळ! खासदार राघव चड्ढांना आम आदमी पार्टीकडून मोठा झटका

Raghav Chadha | दिल्लीच्या राजकारणातून मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना मोठा धक्का दिला आहे. आम आदमी पार्टीने पक्षात मोठा फेरबदल केला आहे. राघव चड्ढा यांना त्यांच्या डेप्युटी लीडर पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यामुळे राघव चड्ढांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा  – लग्नाचे आमिष, बलात्कार अन् गर्भपात…; कोर्टात झाला खरातचा पर्दाफाश, ऑनलाईन सुनावणीत नेमकं काय घडलं?

आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांना डेप्युटी लीडर पदावरून हटवलं आहे. तर आता त्यांच्या जागी लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे चांसलर आणि पक्षाचे खासदार डॉ. अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामळे आता राज्यसभेत आम आदमी पार्टीचे नवे डेप्युटी लीडर हे डॉ. अशोक कुमार मित्तल असणार आहेत.

राघव चड्ढा यांना डेप्युटी लीडर पदावरून हटवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत राघव चड्ढा यांची कुठलीही भेट न झाल्यामुळे आणि सोशल मीडियावर या संदर्भात चड्ढा यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने ते पक्षापासून लांब जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेत बोलण्यासाठी जास्त वेळ देऊ नये, अशी विनंती पत्राच्या माध्यमातून केली होती. तर मागील काही दिवसांपासून राघव चड्ढा हे डिलिव्हरी बॉईजच्या समस्या, विमानतळावर मिळणारा महागडा चहा अशा अनेक विषयांवर ते राज्यसभेत बोलताना दिसत आहेत. यादरम्यान आता पक्षाकडून चड्ढा यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कोण आहेत डॉ. अशोक कुमार मित्तल ?

आम आदमी पार्टीचे नवे डेप्युटी लीडर हे डॉ. अशोक कुमार मित्तल हे आम आदमी पार्टीचे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आणि अनुभवी असे खासदार आहेत. त्यांनी संसदेच्या मागच्या सत्रामध्ये कृषी आणि शिक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर ठामपणे आपली मतं मांडली होती. तर अशोक कुमार मित्तल हे पंजाबचे राज्यसभा खासदार आहेत. तसेत आता ते राज्यसभेत आम आदमी पार्टीचे नवे उपनेते असतील.

दरम्यान, राघव चड्ढा यांच्यावर ही कारवाई का करण्यात आली? याबाबत अद्याप आम आदमी पार्टीने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. तसेच अरविंद केजरीवाल यांनी देखील याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाहीये. मात्र, पक्षाशिस्तिचं पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असावी, अशा शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts