• Home
  • राजकारण
  • चर्चेला पूर्णविराम! पार्थ पवारांकडून पटेल, तटकरेंची पाठराखण, शरद पवार गटाला चपराक
Top News

चर्चेला पूर्णविराम! पार्थ पवारांकडून पटेल, तटकरेंची पाठराखण, शरद पवार गटाला चपराक

Parth Pawar supports Patel And Tatkare

Parth Pawar supports Patel And Tatkare : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (Ajit Pawar passed away) राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या एका पत्रामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असताना अजित पवार यांचे सुपूत्र आणि पक्षाचे राज्यसभा खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण (Explanation) दिले आहे.

शरद पवार गटाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना चपराक

दरम्यान, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणेच कार्याध्यक्षांनाही अधिकार द्यावेत, अशी मागणी निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्ष हायजॅक केला जातोय, असा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता. त्यानंतर हे पत्र समोर आल्यानंतर वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र, पार्थ पवार यांच्या एक सोशल मिडिया पोस्टमुळे या सर्व दावे-प्रतिदावे यांनी पूर्णविराम मिळाला आहे. तसेच रोहित पवार आणि इतर शरद पवार गटाच्या नेत्यांना हा एकप्रकारे चपराक म्हणावा लागेल.

त्या गोष्टीचा ठामपणे निषेध केला पाहिजे – पार्थ पवार

निराधार बातम्या आणि केवळ तर्क-वितर्कावर आधारित कथा यांद्वारे प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांचे अनेक दशकांचे निष्ठावान योगदान आणि नेतृत्व आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहे. अशा वरिष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, याचा ठामपणे निषेध केला पाहिजे, असं पार्थ पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

पडद्यामागे नेमकं प्रकरण काय घडलं होतं?

अजितदादा यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल आणि सुनि तटकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. या पत्रात पक्षाच्या कार्याध्यक्षांनाही राष्ट्रीय पक्षाध्यक्षाप्रमाणेच अधिकार द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

सुनेत्रा पवार यांच्याकडून पत्रव्यवहार रद्द करण्याची मागमी

त्यानंतर 10 मार्च रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. या पत्रात 28 जानेवारीनंतर निवडणूक आयोगाशी केलेला पत्रव्यवहार आणि त्यात केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करावं, असं सांगण्यात आलं. त्यामुळेच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बाजूला सारण्यात आलं का? असे सवाल उपस्थित होत होते, मात्र पार्थ पवार यांच्या एक ट्टिटमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts