Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भोंदूबाबा खरात प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “त्याच्यासोबत असलेल्या महिला…”
Top News

भोंदूबाबा खरात प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “त्याच्यासोबत असलेल्या महिला…”

Sharmila Thackeray On Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून (Ashok Kharat Case) संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. ढोंगी अशोक खरातने (Ashok Kharat) अनेक विवाहित महिला, तरूणींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आत्तापर्यंत खरातवर 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक पीडित महिलांनी धैर्याने समोर येत खराविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर आता या प्रकरणात अनेक राजकीय व्यक्तींचा संबंध असल्याचंही म्हटलं जात आहे. सध्या विशेष तपास पथकाकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. तर आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! भिवंडीत 10 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; जिन्यातच रचला सापळा

आज (8 एप्रिल) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नवीन मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभानंतर शर्मिला ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खरात प्रकरणावर भाष्य केलं.

खरात प्रकरणावर काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

शर्मिला ठाकरेंना माध्यमांनी खरात प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यावर त्या म्हणाल्या की, राज्यामध्ये नेमकं काय चाललं आहे? खरातसोबत ज्या महिला होत्या त्यापैकी कोणती महिला आपल्याला बेशुद्ध अवस्थेत दिसली? महिलांना कळायला पाहिजे, आपण नेमकं काय करतो, असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी पीडित महिलांचे कान टोचले.

पुढे त्या म्हणाल्या की, ज्यावेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते तेव्हा आम्हाला अनेक बाबा भेटायला आले होते. मात्र, त्यावेळी आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की, आम्ही कोणत्याही बाबाच्या पाया पडणार नाही. तुम्ही या आणि भेटून जा”, असंही शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. तर त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. याच ढोंगी अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत, उद्योगपतींसोबत जवळचे संबंध होते. धर्माच्या नावाखाली खरातने अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. एसआयटीकडून आणि नाशिक पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार, लोकांची आर्थिक फसवणूक, लुबाडलेल्या जमीन जुमला अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts