• Home
  • लाईफस्टाईल
  • अक्षय तृतीयेची खरेदी करताय? ‘या’ वस्तू टाळल्या नाहीत तर पश्चाताप होऊ शकतो!
लाईफस्टाईल

अक्षय तृतीयेची खरेदी करताय? ‘या’ वस्तू टाळल्या नाहीत तर पश्चाताप होऊ शकतो!

Akashay Tritiya 2026

Akshaya Tritiya Shopping Tips: तुम्हीही अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. चला, जाणून घेऊया या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणे टाळावे.

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानला जाणारा दिवस आहे. यंदा १९ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी केलेले दान, जप, पूजन आणि खरेदी यांचे फल अखंड राहते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते, असे मानले जाते. त्यामुळे सोने-चांदी खरेदी, नवीन कामांची सुरुवात आणि गुंतवणूक करण्याला विशेष महत्व दिले जाते. ‘

हेही वाचा: आलिया भट्टची लाडकी बहीण अडकली साखरपुड्याच्या बंधनात; कोण आहे तिचा होणारा नवरा?

मात्र, ज्या प्रकारे काही गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते, त्याचप्रमाणे काही वस्तू या दिवशी खरेदी करणे टाळावे, असेही पारंपरिक समजुतीत सांगितले जाते. चुकीची खरेदी केल्यास शुभ लावर परिणाम होऊ शकतो, अशी धारणा आहे.

कोणत्या वस्तू खरेदी करणे टाळावे?

लोखंड आणि स्टील

लोखंड आणि स्टीलच्या वस्तू खरेदी टाळाव्यात. या धातूंना कष्ट, अडथळे आणि कठोरतेचे प्रतीक मानले जाते.

काळ्या रंगाच्या वस्तू

काळ्या रंगाच्या वस्तूंची खरेदी टाळणे योग्य मानले जाते, कारण काळा रंग नकारात्मकतेशी जोडला जातो.

काचेच्या वस्तू

काच किंवा सहज तुटणाऱ्या वस्तू खरेदी करणेही टाळावे. “अक्षय” म्हणजे टिकून राहणारे, आणि काच तुटण्याशी जोडली जाते, त्यामुळे ती या संकल्पनेला विरोधी मानली जाते.

सेकंड-हँड वस्तू

जुनी किंवा सेकंड-हँड वस्तू घेणे टाळावे, कारण अक्षय तृतीया हा दिवस नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे.

धारदार वस्तू

धारदार वस्तू जसे की सुरी, कात्री यांची खरेदीही या दिवशी टाळावी. अशा वस्तू संघर्ष आणि तणावाचे प्रतीक मानल्या जातात.

इंधनाशी संबंधित वस्तू

तेल, कोळसा किंवा इंधनाशी संबंधित वस्तू खरेदी करणेही टाळावे, कारण त्या दैनंदिन खर्चाशी संबंधित असतात, समृद्धीशी नाहीत.

कोणत्या वस्तू खरेदी करावे?

या दिवशी सोने, चांदी, तांबे यांसारख्या धातूंच्या वस्तू, नवीन कपडे, धार्मिक वस्तू किंवा मालमत्ता खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच दानधर्म करणेही अत्यंत फलदायी ठरते.

अक्षय तृतीया हा केवळ खरेदीचा दिवस नसून सकारात्मकता, श्रद्धा आणि नवीन सुरुवातींचा उत्सव आहे. योग्य निर्णय घेतल्यास हा दिवस आयुष्यात समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ शकतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts