Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • यंदा अक्षय तृतीया कधी आहे? सोने आणि वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर!
Top News

यंदा अक्षय तृतीया कधी आहे? सोने आणि वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर!

Akshaya Tritiya

Akshaya Tritiya 2026 Date: अक्षय तृतीया सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून मोठ्या उत्साहात साजरा होतो. पाहा २०२६ मध्ये तो कधी येतो आणि सोने-वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त काय आहे.

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस आहे. हा फक्त सण नसून, नवीन कामे सुरू करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. म्हणूनच अनेक लोक या दिवशी सोने, घर, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात. तसेच या दिवशी आंब्याची पूजा करून खायला सुरुवात केली जाते. अक्षय तृतीयेला अबूझ मुहूर्त म्हणतात; म्हणजे या दिवशी विशेष मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही, सर्व शुभ काम करणे योग्य ठरते.

हेही वाचा: ‘या’ मूलांकांचं प्रेम जीवन होईल खास; नात्यात येईल गोडवा, जाणून घ्या १ ते ९ मूलांकांचे आजचे राशिभविष्य!

अक्षय तृतीया नेमकी कधी आहे?

पंचांगानुसार तृतीया तिथीची सुरुवात १९ एप्रिलला सकाळी १०:२९ पासून सुरू होणार असून २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:२७ पर्यंत संपेल. उदय तिथीनुसार, अक्षय तृतीया १९ एप्रिल रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सोने, दागिने किंवा वाहन खरेदीसाठी पूर्ण १९ तासांचा शुभ कालावधी उपलब्ध राहतो.

या दिवशी काय करावे?

सकाळी लवकर उठून स्नान करावे.

आपल्या घरात किंवा मंदिरात पूजा, हवन आणि यज्ञ करावे.

पूर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण करावे (पाणी, तिळ किंवा अक्षत वापरून).

सोने, चांदी, वाहन किंवा घर खरेदी करणे लाभदायक ठरते.

नवीन व्यवसाय किंवा संकल्प सुरू करणे दीर्घकालीन समृद्धीसाठी शुभ आहे.

सोने खरेदीसाठी मुहूर्त

सकाळ १०:४९ ते दुपारी १२:२० : अमृत मुहूर्त

दुपारी ०१:५८ ते दुपारी ०३:३५ : शुभ मुहूर्त

संध्याकाळ ०६:४९ ते रात्री १०:५७ : शुभ, अमृत, चर मुहूर्त

या मुहूर्तात घर खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे, विवाह, गृहप्रवेश किंवा सोने-आभूषण खरेदी करणे अत्यंत लाभदायक ठरते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts