Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • वाल्मिक कराडचा ‘तो’ अवतार पाहून समर्थकही बुचकळ्यात
Top News

वाल्मिक कराडचा ‘तो’ अवतार पाहून समर्थकही बुचकळ्यात

Valmik Karad Avatar

Valmik Karad Avatar : आमचा वाल्मीक अण्णा एकदा बाहेर येऊ दे, हत्तीवरून मिरवणूक काढू… असं म्हणणाऱ्या अण्णाभक्तांचा मूड तेव्हा ऑफ झाला असेल जेव्हा पोलिसांनी त्याला आरोग्य तपासणीसाठी तुरुंगाबाहेर काढला. पिकलेले केस, अनवाणी चाल, गळालेलं शरीर, अंगात गुलाबी शर्ट, तोंडावर मास्क, उजव्या हातात दोरखंड आणि डाव्या खांद्यावर नॅपकिन… वाल्मीक कराडचा (Valmik Karad) हा अवतार पाहून अण्णाभक्तांमधून चर्चेचा सूर उमटला… आरं ह्यो वाल्मीक अन्ना का रं? धनूभाऊचं (Dhananjay Munde) ज्याच्याशिवाय पान बी हलत नाही असं जे म्हनत व्हती त्यो ह्योच वाल्मीक कराड का रं? न्हाय रं? आरं व्हय रं! ह्यो वाल्मीक अन्नाच हाय रं..! अशी कुजबूज काल ऐकायला मिळाली.

हेही वाचा – नवं घर उभं राहत असताना काळाचा घाला; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू

वाल्मीक कराड… आज 473 दिवस झाले तो पोलीस कोठडीची हवा खातोय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून त्यांची हत्या केल्या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून 31 डिसेंबर 2024 रोजी त्याला अटक झाली होती.

कराडला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने सलाइन चढवली

कराडला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अण्णाभक्तांच्या काळजात धस्स झालं म्हणे! वाल्मिक कराडची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. डायबिटीस, बीपी, स्लिप Apniya या आजारांनी ग्रस्त असलेल्या या वाल्मीक कराडच्या काही टेस्ट करण्यात आल्या. मात्र सर्व टेस्ट रिपोर्ट जवळपास नॉर्मल असल्याचं समोर आल्यानंतर सलाइनची एक बाटली चढवून त्याला सोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्याला पुन्हा जिल्हा कारागृहात नेण्यात आलं.

अन्नाच्या पायात चपला बी नव्हत्या रं, अशी कुजबुज सुरू

आरं अन्नाच्या पायात चपला बी नव्हत्या रं, अशी कुजबुज सुरू झाली आणि मग काही अण्णाभक्तांना वाल्मीक कराडनं घेतलेल्या त्या शपथेची पुन्हा एकदा आठवण झाली… मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात आजही फरार असलेला आरोपी बबन गित्ते आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला वाल्मीक कराड यांच्या जुन्या वादातून एकमेकांनी घेतलेल्या शपथेमुळं वाल्मीक कराड आजही अनवाणी फिरतोय, असं म्हटलं जातंय.

बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत चपला घालणार नाही

जोपर्यंत वाल्मीक कराडला संपवणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही, अशी शपथ बबन गित्तेनं घेतलीये, तर जोपर्यंत बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत चपला घालणार नाही, अशी शपथ वाल्मीक कराडनं घेतली होती म्हणे! एकेकाळी माजी मंत्री धनंजय मुंडेंचा राइट हॅन्ड मानला गेलेला, त्यांचं जगमित्र कार्यालय एकहाती सांभाळलेला, परळीचा नगरसेवक, गटनेता, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून मिरवलेला, शेकडो समर्थकांना सोबत घेऊन महागड्या गाड्यांमधून फिरलेला आणि समर्थकांकडून लावल्या जाणाऱ्या बॅनरवर, सोशल मीडियावर आपला वाल्मीक अण्णा म्हणून फोटोसह झळकलेला हाच तो वाल्मीक कराड.

कराड हातात बेड्या आणि पायात चपला नसलेल्या अवस्थेत

कधीकाळी बीडमध्ये गाडीशिवाय न फिरणारा वाल्मीक कराड आज त्याच बीडमध्ये हातात बेड्या आणि पायात चपला नसलेल्या अवस्थेत फिरतोय… त्याची ही दयनीय अवस्था पाहून आज त्याचेच समर्थक त्याला ओळखेनासे झालेत. ह्यो वाल्मीक अन्ना का रं? असं एकमेकांना विचारून खात्री करू लागलेत. ‘संतोष देशमुख हत्ये प्रकरणात अटक झाल्यानंतर आमचा वाल्मीक अण्णा आज बाहेर येईल, उद्या बाहेर येईल म्हणणारे त्याचे समर्थक आज अण्णालाच ओळखेनासे झालेत! आज सव्वा वर्ष होऊन गेलं पण त्यांच्या वाल्मीक अण्णाला जामीन पण मिळेना! आमचा वाल्मीक अण्णा एकदा बाहेर येऊ दे, हत्तीवरून मिरवणूक काढू… असं म्हणणारे हेच अण्णाभक्त आज त्याला अशा फाटक्या अवस्थेत पाहून मूड ऑफ झाल्यागत एकमेकांना विचारतायत… आरं ह्यो वाल्मीक अन्ना का रं? न्हाय रं?
आरं व्हय रं! ह्यो वाल्मीक अन्नाच हाय रं..!

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts