Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • धार्मिक
  • योग्य विधींसह बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; 25 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं मंदिर
ताज्या बातम्या

योग्य विधींसह बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; 25 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं मंदिर

योग्य विधींसह बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; 25 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं मंदिर

बद्रीनाथ Chardham Yatra 2026 : उत्तराखंडातील चारधाम यात्रा सुरु झाली आहे. केदारनाथनंतर उत्तराखंडमधील चमोली येथील बद्रीनाथ धामचे दरवाजे आज उघडले आहेत. भगवान बद्रीनाथ 149 दिवसांनंतर भक्तांसमोर प्रकट झाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत बद्रीनाथ मंदिराचे भव्य दरवाजे उघडण्यात आले. सकाळी सुमारे 6:15 वाजता जेव्हा पूर्ण विधींसह हजारो भक्तांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले, तेव्हा संपूर्ण आकाश भगवान बद्रीनाथांच्या जयघोषानं दुमदुमलं.

हेही वाचा : बारामतीचा कारभारी जय पवार? २०२९ ची निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत

25 क्विंटल फुलांनी सजवलं मंदिर :

भगवान बद्रीनाथांच्या दिव्य दर्शनासाठी मंदिर 25 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. भगवान बद्री विशाल मंदिरात प्रथमच फुलांनी ‘ओम लक्ष्मीपती नमो’ हे शब्द लिहिण्यात आले आहेत. तसंच ‘जय श्री बद्री नारायण’ आणि ‘वैकुंठाय नमो’ हे देखील लिहिण्यात आलं आहे.

दरवाजे बंद का होते? :

वास्तविक हे चारही धाम उंच हिमालयीन प्रदेशात वसलेले आहेत. परिणामी, हिवाळ्यात या भागांमध्ये मुसळधार हिमवृष्टी आणि तीव्र थंडीचा धोका असतो. यामुळंच दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चार धाम मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी बंद केले जातात. पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात चार धाम मंदिरांचे दरवाजे पुन्हा उघडले जातात. चार धाम यात्रा अंदाजे सहा महिने चालते. लाखो भाविक दर्शनासाठी इथं येतात, जे उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानलं जातं.

चार धाम यात्रेला सुरुवात :

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यानं, उत्तराखंडमधील चार धाम यात्रा 2026 आता पूर्णपणे सुरु झाली आहे. यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरांचे दरवाजे सर्वप्रथम 19 एप्रिल रोजी, अक्षय तृतीयेला उघडण्यात आले. त्यानंतर, 22 एप्रिल रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजेही उघडण्यात आले. यासह, श्रद्धा, भक्ती आणि आदराचा प्रवास असलेली चार धाम यात्रा सुरू झाली आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts