बंगळूर RCB Beat DC : इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 34वा साखळी सामना बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या आरसीबीनं हा सामना 5 गडी राखून जिंकला. यासह आरसीबीनं हंगामात पाचवा विजय मिळवला.
हेही वाचा : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांतही मिळेल कन्फर्म तिकीट! रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात उन्हाळी विशेष
गुजरातची प्रथम फलंदाजी :
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनं 20 षटकांत तीन गडी गमावून 205 धावा केल्या. साई सुदर्शन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी करुन गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करुन दिली. गिल 32 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, सुदर्शनचे 58 चेंडूंतील 100 धावांचं शानदार शतक दिसून आलं. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
कोहलीची दमदार खेळी :
लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही, कारण 24 धावांवर जेकब बेथेलच्या रुपानं त्यांनी पहिली विकेट गमावली. यानंतर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलनं विराट कोहलीला उत्कृष्ट साथ दिली आणि धावसंख्या वेगानं पुढं नेली. या सामन्यात कोहली आणि पडिक्कलनं दुसऱ्या विकेटसाठी 59 चेंडूंमध्ये 155 धावांची भागीदारी केली, ज्यामुळं सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. या सामन्यात देवदत्त पडिक्कल 55 धावा करुन बाद झाला, तर विराट कोहलीनं 81 धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सकडून रशीद खाननं 2 बळी घेतले, तर मोहम्मद सिराज, जेसन होल्डर आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.








