Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • चेन्नईचा घरच्या मैदानावर दारुण पराभव; गुजरातनं मिळवला एकहाती विजय
क्रीडा

चेन्नईचा घरच्या मैदानावर दारुण पराभव; गुजरातनं मिळवला एकहाती विजय

चेन्नईचा घरच्या मैदानावर दारुण पराभव; गुजरातनं मिळवला एकहाती विजय

चेन्नई Gujarat Titans : इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 37वा साखळी सामना चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला, ज्यात गुजरात टायटन्सनं 8 गडी राखून विजय मिळवला. हा गुजरातचा हंगामातील चौथा विजय ठरला आहे, तर चेन्नईचा पाचवा पराभव झाला आहे.

हेही वाचा : सूर्यवंशीची शतकी खेळी व्यर्थ; शर्मा-किशनच्या दमदार खेळीच्या बळावर हैदराबादचा सलग

चेन्नईकडून ऋतुराजचं अर्धशतक :

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, चेन्नई सुपर किंग्सनं 20 षटकांत 7 गडी गमावून 158 धावा केल्या. चेंज सुपर किंग्सची सामन्याची सुरुवात खराब झाली आणि 37 धावांवर त्यांनी 4 गडी गमावले. त्यानंतर, त्यांचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं डाव सावरला आणि शेवटपर्यंत फलंदाजी करत 60 चेंडूंमध्ये नाबाद 74 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडाने तीन, तर अर्शद खाननं दोन बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

सुदर्शनची दमदार खेळी :

लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात टायटन्सनं शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करुन शानदार सुरुवात केली. गिल 33 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. येथून पुढं सुदर्शनला जॉस बटलरची साथ मिळाली आणि दुसऱ्या विकेटसाठी 60 चेंडूंतील त्यांच्या 97 धावांच्या भागीदारीनं सामना पूर्णपणे एकतर्फी करुन टाकला. या सामन्यात साई सुदर्शननं 87 धावा केल्या, तर बटलरनं नाबाद 39 धावा केल्या. सीएसकेच्या गोलंदाजीत अकील होसेन आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts