Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पवारांच्या घरी स्नेहभोजन, सुनेत्रा पवारांसह सर्व सदस्य उपस्थित राहणार.. कारण काय?
Top News

पवारांच्या घरी स्नेहभोजन, सुनेत्रा पवारांसह सर्व सदस्य उपस्थित राहणार.. कारण काय?

Pawar family dinner meeting

Pawar family dinner meeting : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) सर्वात प्रभावशाली आणि कायम चर्चेत असलेल्या पवार कुटुंबातील (Members of the Pawar family) सर्व सदस्य आज पुण्यातील ‘मोदी बाग’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी ( Sharad Pawar) एकत्र जमले आहेत. निमित्त आहे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची कन्या रेवती सुळे यांच्या विवाह निश्चित करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांतील राजकीय उलथापालथ आणि विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतरची परिस्थिती पाहता, या स्नेहभोजनाकडे केवळ एक कौटुंबिक कार्यक्रम (Family Event) म्हणून न पाहता, त्याकडे अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचा केंद्रबिंदू म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा –  बुलढाण्यात खळबळ! ‘शिवाजी कोण होता?’ वादावरून प्रकाशकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळपासूनच मोदी बागेबाहेर माध्यमांची आणि राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, मग तो राजकीयदृष्ट्या कोणत्याही गटात असला तरी, या स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या निधनाला आज बरोबर तीन महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे मोदी बागेत आगमन होणे, हे या संपूर्ण भेटीचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे.

दुखाचे सावट अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही

रेवती सुळे यांचे लग्न नागपूरचे प्रसिद्ध व्यावसायिक अरुण लखाणे यांचे चिरंजीव सारंग लखाणे यांच्याशी ठरले आहे. एका बाजूला लग्नासारखा आनंदाचा क्षण असला तरी, दुसरीकडे अजित पवार यांच्या जाण्याने कुटुंबावर आलेले दुखाचे सावट अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही. संध्याकाळी ५ वाजता जेव्हा पवार कुटुंबातील सर्व पिढ्या एकत्र आल्या, तेव्हा तिथे एक भावनिक वातावरण पाहायला मिळाले. शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांनी स्वतः सर्व पाहुण्यांचे स्वागत करतायत. या स्नेहभोजनाला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. जय पवार सध्या कामानिमित्त बाहेर असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, पार्थ आणि सुनेत्रा वहिनींच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर या दोन्ही कुटुंबांमधील दुरावा कमी होईल का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

भविष्यातील मोठ्या राजकीय हालचालींची नांदी

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, हे केवळ जेवण नसून भविष्यातील मोठ्या राजकीय हालचालींची नांदी आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांचा गट आणि कार्यकर्ते सध्या दिशाहीन अवस्थेत आहेत. बारामतीमधील राजकीय वारसा आणि अजित पवारांनी उभ्या केलेल्या संस्थांचे भविष्य यावर आज चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः विद्या प्रतिष्ठानसारख्या मोठ्या संस्थेमध्ये अजित पवारांच्या जागी कोणाची नियुक्ती करायची, यावर शरद पवार कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधू शकतात. अजित पवारांच्या पश्चात पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार वेगळ्या राजकारणाची धुरा सांभाळणार, की शरद पवार पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबाला आणि पक्षाला एका छताखाली आणणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी या भेटीत राजकारण टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी, जेव्हा पवार एकत्र येतात तेव्हा तिथे चर्चा ही राजकारणाचीच होते, हा इतिहास आहे.

निर्माण झालेली कटुता या स्नेहभोजनामुळे कमी होईल

गेल्या काही काळापासून शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात निर्माण झालेली कटुता या स्नेहभोजनामुळे काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. मोदी बागेबाहेर जमलेल्या काही कार्यकर्त्यांच्या मते, साहेब हे कुटुंबाचे प्रमुख आहेत. राजकारण आपल्या जागी असले तरी संकटकाळात कुटुंब एकत्र असणे गरजेचे आहे. अजित दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे हाच उत्तम मार्ग आहे. राज्याच्या राजकारणात पवारांचे वर्चस्व नेहमीच राहिले आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर जर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकजुटीने दिसले, तर त्याचे पडसाद पुन्हा संपूर्ण राज्याच्या राजकारणात उमटू शकतात.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts