Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • २२ उमेदवारांना ४ हजार मते, तर एकट्या सुनेत्रा पवारांना २ लाख १८ हजार मते
Top News

२२ उमेदवारांना ४ हजार मते, तर एकट्या सुनेत्रा पवारांना २ लाख १८ हजार मते

Sunetra Pawar 2.18 lakh votes

Sunetra Pawar 2.18 lakh votes : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Baramati Election) दोन लाख १८ हजारांहून (2 lakhs 18 thousand votes)अधिक मतांच्या फरकाने जिंकली. यामुळे राज्यासह देशात मोठ्या फरकाने विधानसभा निवडणुका जिंकण्याचे सर्व विक्रम (News Record) सुनेत्रा पवारांनी मोडून नवा इतिहास रचला आहे. याशिवाय त्यांच्या विरोधात असलेल्या २२ उमेदवारांना मिळून केवळ ४ हजार मते मिळाली आहेत.

हेही वाचा – ‘सुंभ जळाले पण, पीळ नाही जात’; सूर्यास्तापर्यंत जिंकू, ममतांने कार्यकर्त्यांना आवाहन

महादेव जानकरांच्या उमेदवाराला ९३५ मते

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रा. आर. वाय. गुटुकडे दुसऱ्या क्रमांकावर आले. पण त्यांनाही फक्त ९३५ मते मिळाली. अपक्ष उमेदवार विराज महादेव शिंदे यांना ५३३ मते मिळून तिसरा क्रमांक मिळाला. बाकी कोणत्याही उमेदवाराला ५०० मतेही गाठता आली नाहीत. सगळ्यात चर्चेचा विषय बनला तो नोटाचा! ७७४ लोकांनी नोटा बटण दाबलं. हे इतर २१ उमेदवारांच्या एकूण मतांपेक्षा जास्त होतं. म्हणजे जनतेने इतर उमेदवारांकडे पाठ फिरवली, असंच म्हणावं लागेल.

११ उमेदवारांना तर १०० पेक्षा कमी मते

या निवडणूकीत ११ उमेदवारांना तर १०० पेक्षा कमी मते मिळाली. वकील अविनाश गायकवाड यांना ९२, साजन भगवान यांना ८५, रोहित राजू भोसले ७०, बाळासो मारुती धपाटे ५७, योगेश मोहन ५०, सतीश नाना सोनवणे ४८, गजानन पाटील ४७, सागर भिसे ४५, सीताराम विठ्ठल ४५, दत्तात्रेय बेदरे ४३ आणि चंद्रकांत रंभाजी मोती यांना ४२ मते मिळाली.

६० वर्षापासून पवार कुटुंबाचं वर्चस्व

बारामती ही पवार कुटुंबाची पारंपरिक जागा आहे. गेल्या ६० वर्षांपासून या मतदारसंघावर पवार कुटुंबाचं वर्चस्व आहे. यापूर्वी शरद पवार यांनी सलग सहा वेळा इथून निवडून येत विकासाला गती दिली. त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी १९९१ पासून सलग आठ वेळा या जागेचं प्रतिनिधित्व केलं. बारामती हे पवारांचा गड मानलं जातो. साखर कारखाने, विकास कामं आणि स्थानीय प्रभावामुळे इथं पवार कुटुंबाची पकड मजबूत राहिली.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts