• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • दिव्यांग उमेदवारांना मोठा दिलासा; 30 जूनपर्यंत रेल्वे परीक्षेत मोठी सूट, सहाय्यकासह बसण्याची परवानगी
ताज्या बातम्या

दिव्यांग उमेदवारांना मोठा दिलासा; 30 जूनपर्यंत रेल्वे परीक्षेत मोठी सूट, सहाय्यकासह बसण्याची परवानगी

railway

Railway  Exam | दरवर्षी रेल्वे नोकरीसाठी (Railway Jobs) लाखो तरूण विविध स्पर्धा परीक्षा देत असतात. तर या परीक्षा देणाऱ्या तरूणांपैकी बरेच तरूण हे दिव्यांग प्रवर्गातील असतात. तर आता रेल्वेची तयारी करणाऱ्या या दिव्यांग तरूणांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

हेही वाचा | देशसेवेचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी! CRPF मध्ये मेगा भरती; जाणून घ्या पात्रता, जागा अन् अर्जाची तारीख

दिव्यांग उमेदवारांना 30 जूनपर्यंत रेल्वे परीक्षेत मोठी सूट

रेल्वे मंत्रालयाने दिव्यांग तरूणांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे परीक्षा (Railway Exam) देणाऱ्या लाखो दिव्यांग तरूणांसाठी होणारे मोठे बदल 30 जूनपर्यंत पुढे ढकलले आहेत. याचा अर्थ असा की, दिव्यांग उमेदवार आगामी आरआरबी एनटीपीसी अंडरग्रेजुएट (CBT-1) परीक्षा, असिस्टंट लोको पायलट आणि ज्युनियर इंजिनिअर परीक्षांना त्यांच्या सहाय्यकासह बसू शकणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे की, भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी नवीन नियम बनवण्यात आले आहेत. दिव्यांग उमेदवारांना स्वतःचा लेखक आणण्याऐवजी, परीक्षा संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या लेखक गटाची मदत घ्यावी लागेल.  त्यामुळे आता दिव्यांग उमेदवारांना सहाय्यकांची निवड रेल्वे पॅनेलमधूनच करावी लागेल. तसेच परीक्षेत तंत्रज्ञान आणि विशेष सॉफ्टवेअरचा देखील वापर केला जाईल.

रेल्वेने प्रशासनाने सुरू केलेल्या या नवीन प्रणालीमध्ये एजन्सीकडून सहाय्यक देण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्याची तयारी अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच परीक्षेत दिव्यांग उमेदवारांना प्रति तास दिला जाणारा 20 मिनिटांचा अतिरिक्त वेळ पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. तर देशभरातील परीक्षा केंद्रांवर डिजिटल पायाभूत सुविधा आणि सरकारी लेखकांचा समूह तयार करण्यास वेळ लागत असल्यामुळे हा नियम 30 जूनपर्यंत लागू केला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts