Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • राजस्थान नाही तर महाराष्ट्रातून झाला NEET पेपर लीक; चौकशीत धक्कादायक माहिती समोर
Top News

राजस्थान नाही तर महाराष्ट्रातून झाला NEET पेपर लीक; चौकशीत धक्कादायक माहिती समोर

NEET Paper Leak | सध्या नीट पेपटफुटी (NEET Paper Leak) प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. नीटचा पेपर लीक झाल्यामुळे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशातच आता नीट पेपरफुटी प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. प्राथमिक तपासात या प्रकरणाचा संबंध राजस्थानशी असल्याचं समोर आलं होतं मात्र आता तपास यंत्रणांना यात महाराष्ट्राचाही संबंध आढळला आहे.

हेही वाचा – NEET पेपर लीक प्रकरण तापलं; SOG तपासात धक्कादायक खुलासे, जाणून घ्या तपासात काय झालं उघड?

नीटचा पेपर महाराष्ट्रात झाला लीक, खळबळजनक माहिती समोर

समोर आलेल्या माहितीनुसार, नीट पेपरफुटी राजस्थानमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात झाली होती. या प्रकरणी अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. या पेपरफुटीचा नाशिकशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. लीक झालेल्या पेपरची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार करण्यात आली होती. तर नाशिकमध्ये छापण्यापूर्वीच पेपर लीक झाला होता. तसेच हस्तलिखित पेपर सर्वात आधी हरियाणातील गुरुग्राम येथे पोहोचला. फुटलेला पेपर गुरुग्राममधील एका डॉक्टरला देण्यात आला होता.

या प्रकरणात नाशिकमधील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, राजस्थानमधून अटक करण्यात आलेल्या राकेश मांडवियाची ओळख पटल्यानंतर सीकरमधील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑपरेटरची चौकशी सुरू आहे.सध्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी 2026 परीक्षेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. एजन्सीने 3 मे 2026 रोजी होणारी नीट यूजी परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts