Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • 17 वर्षांनंतर पुन्हा गाजणार राज ठाकरेंची ‘ती’ केस; आज ठाणे कोर्टात हजेरी
Top News

17 वर्षांनंतर पुन्हा गाजणार राज ठाकरेंची ‘ती’ केस; आज ठाणे कोर्टात हजेरी

Raj Thackeray 2008 Railway Case

Raj Thackeray 2008 Railway Case : आज 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. मनसेच्या आंदोलनादरम्यान कल्याण रेल्वे स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या ठाणे रेल्वे न्यायालयात सुरू आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2008 साली रेल्वे भरती परीक्षा सुरू असताना कल्याण स्थानक परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केली होती. मराठी तरुणांना डावलून परप्रांतीय उमेदवारांना जास्त प्राधान्य देण्यात येत आहे असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. हिंसाचारादरम्यान रेल्वे मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणात राज ठाकरे यांनी “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” असे वक्तव्य करत परप्रांतीयांविरोधात वातावरण तयार केले आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्यासह सात मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

मागील सुनावणीत काय घडलं?

या प्रकरणाची मागील सुनावणी 11 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी न्यायालयासमोर “मला गुन्हा मान्य नाही” असे स्पष्ट सांगितले होते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करू असेही त्यांनी म्हटले होते.

अटक वॉरंटही बजावले होते

सुनावणीदरम्यान राज ठाकरे न्यायालयात नियमित हजर राहत नसल्याने न्यायालयाने राज ठाकरे आणि इतर आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, नंतर त्यांच्या वकिलांनी अर्ज दाखल केल्यानंतर ते वॉरंट रद्द करण्यात आले.यानंतर राज ठाकरे डिसेंबर 2025 मध्ये ठाणे न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले होते.

सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी कल्याण न्यायालयात सुरू होती. मात्र नंतर हा खटला ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला. आज होणाऱ्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts