Mumbai | 14 मे रोजी पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यातील एका आश्रमावर बॉम्बस्फोट करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनं संपूर्ण पश्चिम बंगाल हादरले होते. आश्रमावर बॉम्बस्फोट केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. तर आता या आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा – 3 महिन्यांपूर्वीचा ‘तो’ प्लॅन यशस्वी झाला असता तर खरात आज सापडला नसता; प्लॅन ऐकून पोलिसही चक्रावले
आश्रमावर बॉम्बस्फोट करणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने बोरिवली रेल्वे स्थानकावरून अटक केली आली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर 14 मे रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एका आश्रमावर बॉम्बस्फोट करण्यात आला होता . तर या प्रकरणी बहारामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. यामध्ये रॉकी खान (24 वय) आणि शहादत सरकार (25 वय) अशी आरोपींनी नावे आहेत. तर रॉकी खान हा कांडी हॉटेल पारा येथील रहिवासी असून तो चालक आहे. तसेच शहादत सरकार हा नतुन पुरा गावचा रहिवासी असून तो मजूर म्हणून काम करतो. या दोन्ही आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयीन औपचारिकता पूर्ण करून त्यांना पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळवली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
माझीहेरपारा येथील किराणा दुकान मालक पशुपतिनाथ साहा यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 12 मे रोजी अज्ञात व्यक्तींनी आश्रमाजवळील दुर्गा मातेच्या मंदिरासमोरील विजेच्या खांबावरून फोटो फाडून काढले होता. त्यानंतर 13 मे रोजी रात्री सुमारे 10:45 वाजता आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी आश्रमाजवळील एका मोकळ्या मैदानात सॉकेट बॉम्ब फेकले. तसेच 14 मे रोजी सकाळी सुमारे साडेदहा वाजता आरोपी मोटारसायकलवरून तक्रारदाराच्या किराणा दुकानात आला आणि हे प्रकरण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्यास आणखी बॉम्ब हल्ले करण्याची धमकी दिली होती.












