• Home
  • लाईफस्टाईल
  • वजन कमी करायचंय? जिमला न जाता ४-५ किलो कमी करण्यासाठी या सवयी फॉलो करा!
लाईफस्टाईल

वजन कमी करायचंय? जिमला न जाता ४-५ किलो कमी करण्यासाठी या सवयी फॉलो करा!

weight loss tips

Weight Loss Tips: वजन कमी करायचं असेल तर जिममध्ये जाणं हे एकमेव पर्याय नाही. घरच्या घरी काही साध्या पण प्रभावी सवयी पाळल्या तर महिन्याभरात ४-५ किलो वजन कमी करणं शक्य आहे. यासाठी आहार, दिनचर्या आणि जीवनशैलीत छोटे बदल करणे महत्त्वाचे ठरते.

ऑफिसच्या कामामुळे अनेकांना दिवसातील जवळपास ८–१० तास एकाच जागी बसून राहावं लागतं. अशा बैठ्या जीवनशैलीमुळे वजन वाढणं ही सामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिम, योगा किंवा कठोर डाएटचा आधार घेतात. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे जिमला जाणं सर्वांनाच शक्य होत नाही. अशा वेळी नेमकं काय करावं, हा प्रश्न अनेकांना पडतो. जर तुम्हालाही हीच अडचण भासत असेल, तर जिमशिवायही काही सोप्या सवयींच्या मदतीने तुम्ही महिन्याभरात ४–५ किलो वजन कमी करू शकता. कसे ते जाणून घ्या

हेही वाचा: बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय; एफडी व्याजदर वाढ, आजपासून नवीन दर लागू

कॅलरी डेफिसिट ठेवा

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा नियम म्हणजे कॅलरी डेफिसिट. म्हणजे शरीराला जितकी ऊर्जा (कॅलरी) लागते. त्यापेक्षा कमी कॅलरी घेतल्या पाहिजेत. यासाठी जंक फूड, साखर आणि तळलेले पदार्थ कमी करा.

रोज चालण्याची सवय लावा

जिमाशिवायही रोज किमान ३०-४० मिनिटे चालणे अत्यंत फायदेशीर ठरते, चालणे हे चरबी कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम मानला जातो.

प्रोटीनयुक्त आहार घ्या

डाळी, अंडी, दूध, पनीर आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा. प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि अनावश्यक खाण्याची सवय कमी होते.

फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा

भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खाल्ल्याने पचन सुधारते आणि भूक नियंत्रित राहते. यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होते.

साखर आणि जंक फूड टाळा

कोल्ड् ड्रिंक्स बिस्किटे, चिप्स आणि पॅकेज्ड फूडपासून दूर राहा. हे पदार्थ वजन वाढवण्यास सर्वात मोठे कारण ठरतात.

पुरेसे पाणी प्या

दररोज ८-१० ग्लास पाणी पिण्याची सवय ठेवा. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि मेटॅबॉलिझम वाढवते.

झोप पूर्ण घ्या

दररोज ७-८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. कमी झोपेमुळे हार्मोन्स बिघडतात आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.

सातत्य ठेवा

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. एकाच दिवसात बदल दिसणार नाही. पण ३-४ आठवड्यांत फरक जाणवू लागतो. शिस्त आणि संयम ठेवल्यास ३ महिन्यांत चांगला परिणाम मिळू शकतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts