Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • १२ वर्षांनंतर जेनिफर विंगेट पुन्हा लग्नाच्या तयारीत? सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत नवे नाते चर्चेत
मनोरंजन

१२ वर्षांनंतर जेनिफर विंगेट पुन्हा लग्नाच्या तयारीत? सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत नवे नाते चर्चेत

Jennifer Winget Marriage News
46

Jennifer Winget Marriage News: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिचं पहिलं लग्न तुटल्यानंतर आता ती नव्या आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफर सिंगापूरमधील उद्योजक इश्माएल विल्यमसोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच हे नातं लग्नात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. जरी दोघांनी अधिकृतरीत्या या नात्याची कबुली दिलेली नसली, तरी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी लग्नाच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: फक्त अर्धा चमचा बडीशेप ठरू शकतो आरोग्याचा गेमचेंजर; जाणून घ्या त्याचे फायदे

असेही सांगितले जाते की, काही दिवसांपूर्वी एका खासगी भेटीत विल्यमने जेनिफरला प्रपोज केले आणि तिनेही सकारात्मक प्रतिसाद देत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघेही लग्नाच्या तयारीत व्यक्त असल्याची माहिती समोर येत आहे.

या जोडप्याचे लग्न ख्रिश्चन परंपरेनुसार पार पडण्याची शक्यता असून, सप्टेंबर- ऑक्टोबर किंवा वर्षअखेरीस समारंभ होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

दरम्यान, काही काळापूर्वी जेनिफरचे नाव तिच्या सहकलाकार करण वाहीसोबत जोडले गेले होते. मात्र, त्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

जेनिफर विंगेटने यापूर्वी २०१२ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी विवाह केला होता. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जेनिफरने तिचं खासगी आयुष्य प्रकाशझोतात येऊ दिलं नव्हतं. आता मात्र तिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांनी पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts