ITR Filing Deadline: जर तुम्ही आयटीआर भरण्याची अंतिम मुदत चुकवली, तर प्राप्तिकर कायद्यातील कलम 234F अंतर्गत उशिरा आयकर रिटर्न सादर केल्याबद्दल लेट फाइलिंग फी लागू केली जाते.
प्राप्तिकर परतावा (ITR) भरण्याचा हंगाम सुरू झाला असून करदात्यांचा अंतिम मुदतीचे पालन करणे अत्यंत महत्वाचे ठरते. अनेक जण शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहतात, मात्र मुदत चुकल्यास आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार आयटीआर उशिरा भरल्यास दंडासह व्याजाचाही भार सहन करावा लागेल.
हेही वाचा: प्रसाद वेदपाठकांच्या पोस्टवर वादग्रस्त रिप्लाय; “मुंबईवर आमचंच वर्चस्व” दाव्याने खळबळ
उशिरा आयटीआर भरल्यास किती दंड?
प्राप्तिकर कायद्यातील कलम २३४ F अंतर्गत निर्धारित मुदतीनंतर आयटीआर दाखल केल्यास लेट फाइलिंग फी आकारली जाते.
वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास कमाल १,००० रुपयांचा दंड लागू शकतो.
वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 5,000 रुपयांपर्यंत लेट फी भरावी लागू शकते.
कर थकबाकी असल्यास व्याजही द्यावे लागेल
जर करदात्याकडे काही कराची थकबाकी असेल आणि ती वेळेत भरली नसेल, तर दंडासोबतच अतिरिक्त व्याज आकारले जाऊ शकते. हे व्याज कर भरण्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत लागू राहते.
कर देयता शून्य असली तरी दंड लागू शकतो?
अनेक करदात्यांना वाटते की कर भरायचा नसल्यास दंडही लागणार नाही. मात्र तसे नाही. जर आयटीआर भरणे बांधकारक असेल आणि अंतिम मुदत चुकली असेल, तर कर देयता शून्य असली तरी लेट फाइलिंग फी लागू होऊ शकते.
बिलेटेड रिटर्न म्हणजे काय?
अंतिम मुदतीनंतर दाखल केलेला आयटीआर ‘बिलेटेड रिटर्न’ म्हणून ओळखला जातो. नियोजित तारखेनंतरही करदाते निश्चित कालावधीत रिटर्न भरू शकतात, मात्र त्यासाठी दंड भरावा लागू शकतो.
कोणाला आयतीआर भरण्यापासून सूट?
ज्यांचे उत्पन्न करमुक्त मर्यादेपेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींना सामान्यतः आयटीआय भरण्याची सक्ती नसते.
जुन्या करप्रणालीत करमुक्त मर्यादा: २.५ लाख रुपये
नवीन करप्रणालीत करमुक्त मर्यादा: ४ लाख रुपये
आर्थिक वर्ष 2025-26 साठी महत्त्वाच्या तारखा
पगारदार कर्मचारी व सामान्य करदाते (ITR-1, ITR-2): 31 जुलै 2026
टॅक्स ऑडिटची आवश्यकता नसलेले व्यवसायिक (ITR-3, ITR-4): 31 ऑगस्ट 2026
टॅक्स ऑडिट आवश्यक असलेले करदाते: 31 ऑक्टोबर 2026
ट्रान्सफर प्रायसिंग नियमांतर्गत करदाते: 30 नोव्हेंबर 2026
बिलेटेड रिटर्न भरण्याची अंतिम संधी: 31 डिसेंबर 2026
रिवाईज्ड रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत: 31 मार्च 2027
करदात्यांनी अंतिम मुदतीपूर्वीच आयटीआर दाखल केल्यास दंड, व्याज आणि इतर प्रशासकीय अडचणी टाळता येऊ शकतात. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून वेळेत रिटर्न भरणे अधिक फायदेशीर ठरू शकते.









