• Home
  • बिजनेस
  • करदात्यांनो जागे व्हा! अपडेटेड ITR साठी उरले फक्त २ दिवस, आजच भरा नाहीतर…
Top News

करदात्यांनो जागे व्हा! अपडेटेड ITR साठी उरले फक्त २ दिवस, आजच भरा नाहीतर…

tax return

ITR-U filing: करदात्यांनो सावधान! आधी भरलेल्या आयकर रिटर्नमध्ये काही चूक झाली असेल किंवा माहिती राहिली असेल, तर ती दुरुस्त करण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहेत. Updated Return (ITR-U) भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.

जर तुम्ही आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाची माहित देताना काही विसरलात किंवा तुमच्या इनकम टॅक्स रिटर्नमध्ये (ITR) काही चुका झाल्या असतील, तर त्या Updated Income Tax Return (ITR-U) द्वारे सुधारण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे.

हेही वाचा: सकाळच्या नाश्त्याला बनवा मुंबई स्टाईल सँडविच, मुलं होतील खुश!

३१ मार्च ही अंतिम तारीख असल्यामुळे, ज्यांना त्यांचे जुने रिटर्न अपडेट करायचे आहेत त्यांनी उशीर करू नये. नाहीतर दंड (लेट पेनल्टी) भरावी लागू शकते. आयकर विभाग इनकम टॅक्स अॅक्टच्या कलम १३९ (८ A) अंतर्गत रिटर्न फाईल करण्याची परवानगी देतो, ज्यामुळे करदात्यांना चुकलेले उत्पन्न जाहीर करण्याची आणि चुका दुरुस्त करण्याची शेवटची संधी मिळते.

किती दिवसात ITR-U भरता येतो?

असेसमेंट वर्ष संपल्यानंतर जास्तीत जास्त ४८ महिन्यांच्या आत अपडेटेड रिटर्न भरता येतो. त्यामुळे प्रत्येक वर्षासाठी वेगळी अंतिम तारीख असते.

उशीर केल्यास किती अतिरिक्त कर?

उशिरा ITR-U भरल्यास तुम्हाला मूळ कारासोबत अतिरिक्त रक्कम भरावी लागते

१ वर्षाच्या आत – २५% अतिरिक्त कर
१ ते २ वर्षांत – ५०% अतिरिक्त कर
२ ते ३ वर्षांत – ६०% अतिरिक्त कर
३ ते ४ वर्षांत – ७०% अतिरिक्त कर

मूळ आयटीआर भरला नासल दर

जर तुम्ही तुमचा मूळ आयकर परतावा (बेसिक इन्कम टॅक्स रिटर्न) वेळेवर दाखल केला नाही, तर तुम्हाला दंड लागू शकतो:

उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त – ५००० रुपये
उत्पन्न ५ लाखांपर्यंत – १००० रुपये

ITR-U फाइल करण्याचे फायदे

चुकलेले उत्पन्न (उदा. बँक व्याज, डिव्हिडंड) दाखवता येते
चुकीचे कर गणित सुधारता येते
आयकर विभागाकडून नोटीस येण्यापूर्वीच चुका दुरुस्त करता येतात
त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकता

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts