Breaking News :
Top News

सकाळच्या नाश्त्याला बनवा मुंबई स्टाईल सँडविच, मुलं होतील खुश!

sandwich breakfast

Mumbai Style Sandwich: संडे म्हटलं की काहीतरी वेगळं खाण्याचा दिवस! तुम्हीही मुलांसाठी नाश्त्यासाठी काही खास करण्याचा विचार करत असाल, तर मुंबई स्टाईल सँडविच घरी नक्की ट्राय करा. पाहताच मुलं खुश होतील.

रविवार म्हणजे घरात काहीतरी खास बनवण्याचा दिवस! मुलानांही रोजच्या नाश्त्यापेक्षा वेगळं काहीतरी खायला हवं असतं. पोहे, उपमा यांसारखे पदार्थ नेहमी आवडतीलच असं नाही, त्यामुळे “आज नाश्त्याला काय बनवायचं? हा प्रश्न अनेकांना हमखास पडतो. जर तुम्हीही या रविवारी मुलांसाठी चविष्ट आणि हेल्दी काहीतरी करण्याचा विचार करत असाल, तर घरच्यता घरी सोप्या पद्धतीने मुंबई सँडविच तयार करा. चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि बनवण्याची सोपी कृती.

हेही वाचा: आता 1 एप्रिलपासून नवीन आयकर नियम लागू होणार; नेमकं काय बदलणार जाणून घ्या A टू Z संपूर्ण माहिती

साहित्य

ब्रेड (ब्राऊन किंवा व्हाईट)
बटर
कोथिंबीर
पुदिना
लसूण
हिरवी मिरची
मीठ
लिंबू
काकडी
कांदा
टोमॅटो
उकडलेले बटाटे

हिरवी चटणी कशी बनवायची?

एका मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर, पुदिना, ४-३ लसूण, ७-८ हिरवी मिरची , मीठ (चवीनुसार), लिंबू घालून मिक्शरमध्ये फिरहून घ्या.

कृती

सर्वप्रथम एक ब्रेड स्लाइस घ्या आणि त्यावर बटर व हिरवी चटणी चांगली लावा.
त्यानंतर त्यावर कापलेली काकडी, कांदा, टोमॅटो आणि उकडलेले बटाटे ठेवा.
दुसऱ्या ब्रेड स्लाइसवरही बटर व हिरवी चटणी लावून वर ठेवा.
आता तुमचा मुंबई स्टाईल सँडविच तयार!
हवे असल्यास तुम्ही त्याला तव्यावर हलक्या आचेवर थोडेसे ग्रील करू शकता, किंवा तसेच थंड खाऊ शकता.
मुलांना नक्कीच आवडेल!

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts