Aanchal Serious Allegations Against Saksham Family : गेल्या वर्षी नांदेडमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या ऑनर किलिंग प्रकरणात नवी वळण आले आहे. प्रियकर सक्षम ताटे याच्या मृतदेहाशी लग्न करून त्याच्या घरी कायमचे राहण्याची शपथ घेणारी त्याची प्रेयसी आंचल मामीडवार (२१) यांनी काही दिवसांपूर्वी सक्षमच्या घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपाची फैरी सुरू झाली आहे. सक्षमच्या आईने माध्यमांसमोर येऊन आंचल अचानक घर सोडल्याचे सांगितले, तर आंचलने सक्षमच्या लहान भावावर गैरवर्तनाचा धक्कादायक आरोप केला आहे.
नांदेडच्या इतवारा परिसरात २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सक्षम ताटे या २० वर्षीय तरुणाी निर्घृण हत्या करण्यात आली. आंचल मामीडवारशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या सक्षमला जातीय कारणास्तव आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी गोळ्या घालून व फरशीने डोक्यात मारून ठार केल्याचा आरोप आहे. हत्या झाल्यानंतर अंत्यविधीपूर्वी आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केले. तिने त्याच्या कपाळावर सिंदूर भरला आणि खून करणाऱ्या कुटुंबीयांविरुद्ध साक्ष देण्याची शपथ घेतली. ती सक्षमच्या घरी राहून त्याच्या कुटुंबीयांची काळजी घेईल, असे ठामपणे जाहीर केले होते. या दृश्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.
सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी लढण्याचे आश्वास
आंचलने स्वतःच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी लढण्याचे आश्वासन दिले. त्या वेळी ती म्हणाली होती, “सक्षम मृत्यूनंतरही जिंकला. मी त्याच्या घरीच राहीन.”घर सोडण्यामागील कारणसक्षमच्या आई संगीता ताटे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आंचल आजीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडून गेली. ती साडेतीन ते आठ महिन्यांपर्यंत त्यांच्या घरी राहिली होती. मात्र, नंतर अचानक निघून गेल्याने कुटुंबीय निराश झाले. सक्षमच्या वडिलांचाही नंतर मृत्यू झाल्याने संगीता एकटी पडल्याचे त्यांनी सांगितले.
सक्षमच्या लहान भावावर गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप
आता आंचलने यास प्रत्युत्तर देताना धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सक्षमच्या लहान भावावर गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे तिला घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे तिने माध्यमांना सांगितले. तसेच, सक्षमला न्याय मिळवण्यासाठी ती एकटी लढत असल्याचेही तिने स्पष्ट केले. या आरोपांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. कुटुंबाची दयनीय अवस्थाया प्रकरणाने ताटे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सक्षमच्या हत्येनंतर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र, सक्षमच्या वडिलांचा मृत्यू, आंचलचे घर सोडणे आणि न्यायासाठी होणारा संघर्ष यामुळे संगीता ताटे यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. वकिली खर्चासाठी पैसे नसल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.






