WhatsApp AI Tools Update: WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच Meta One सब्सक्रिप्शन येण्याची शक्यता आहे. या नव्या प्लॅनमुळे युजर्सना एकाच सब्सक्रिप्शनमध्ये AI टूल्ससोबत आणखी अनेक फीचर्स मिळू शकतात. चला तर जाणून घेऊया आजच्या खास लेखातून
लवकरच व्हाट्सअपमध्ये मेटा वन (Meta One) सब्सक्रिप्शन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नव्या प्लॅनमुळे एकाच सब्सक्रिप्शनमध्ये WhatsApp, Instagram आणि Facebookवरील प्रीमियम फीचर्सचा लाभ मिळू शकतो. रिपोर्टनुसार कंपनी Meta One Plus आणि Meta One Premium असे दोन वेगवेगळे प्लॅन्स आणण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा: उपोषणाचा परिणाम गंभीर! अन्नत्याग आंदोलनात रोहित पवारांची तब्येत खालावली, नेमकं काय झालं?
WhatsAppमध्ये दिसले नवीन सब्सक्रिप्शनचे संकेत
रिपोर्टनुसार, व्हाट्सअँपच्या Android बीटा व्हर्जनमध्ये मेटा वन (Meta One) सब्सक्रिप्शनशी संबंधित काही संकेत आढळले आहेत. यामुळे WhatsApp, Instagram आणि Facebook या तिन्ही प्लॅटफॉर्म्सना एकाच प्रीमियम प्लॅनमध्ये जोडले जाऊ शकते. या प्लॅनमुळे युजर्सना विविध प्रीमियम फीचर्सचा एकत्रित अनुभव मिळू शकतो.
दोन वेगवेगळे प्लॅन येण्याची शक्यता
माहितीनुसार, मेटा कंपनी मेटा वन प्लस आणि मेटा वन प्रीमियम असे दोन सब्सक्रिप्शन प्लॅन्स सादर करू शकते. हे दोन्ही प्लॅन्स वेगवेगळ्या स्तरांवरील फीचर्ससह उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
AI फीचर्स आणि क्रिएटिव्ह टूल्सचा समावेश
Meta One Plus प्लॅनमध्ये AI आधारित टूल्स, इमेज जनरेशन आणि व्हिडिओ क्रिएशन समावेश असू शकतो. यामुळे यूजर्सना थेट AIच्या मदतीने कंटेंट तयार करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय व्हाट्सअँपसह इतर मेटा अॅप्समधील काही प्रिमियम फिचर्सही या प्लॅनमध्ये मिळू शकतात.
प्रीमियम प्लॅनमध्ये अधिक अॅडव्हान्स AI क्षमता
Meta One Premium प्लॅनमध्ये अधिक शक्तिशाली AI फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यात जटिल प्रॉम्प्ट समजण्याची क्षमता, जास्त AI वापर मर्यादा आणि अधिक इमेज-व्हिडिओ जनरेशन क्रेडिट्सचा समावेश असू शकतो. हा प्लॅन मुख्यतः कंटेंट क्रिएटर्स आणि प्रोफेशनल यूजर्ससाठी उपयुक्त ठरू शकतो.
अधिकृत घोषणा अद्याप नाही
सध्या मेटाकडून या सब्सक्रिप्शन प्लॅन्सबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र बीटा व्हर्जनमध्ये मिळालेल्या संकेतांमुळे लवकरच याबाबत मोठी अपडेट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








