Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • बाजारात अचानक मोठी घसरण! सोनं-चांदीचे दर कोसळले; जाणून घ्या आजचे ताजे दर
Top News

बाजारात अचानक मोठी घसरण! सोनं-चांदीचे दर कोसळले; जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold- silver Price Today India
81

Gold- silver Price Today India: आज रविवार रोजी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चला तर जाणून घेऊया आजचे ताजे दर काय आहेत

आज सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा लक्षणीय घसरण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये मोठा बदल नोंदवला गेला असून गुंतवणूकदारांमध्ये चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात सुमारे ४,५०० रुपयांची घट झाली आहे. काल १,५१,५०० प्रति तोळा असलेले सोनं आज घसरून सुमारे १,४७,००० वर आले आहे.

हेही वाचा: मातोश्रीवर राजकीय खलबते! ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत बैठक

चांदीच्या दरातही मोठी घसरण

त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. काल २,४९,००० प्रति किलो असलेली चांदी आज सुमारे २,३८,००० पर्यंत खाली आली आहे, म्हणजेच जवळपास ११,००० ची घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ- उतार

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ- उतार, डॉलरची स्थिती आणि आयात खर्चातील बदल यांचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात सोने, तेल आणि गॅस यांसारख्या आयात वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा वापर होतो. त्यामुळे डॉलरवरील दबाव वाढला की त्याचा थेट परिणाम या वस्तूंच्या किमतींवर दिसतो.

नागरिकांनी अनावश्यक खर्च कमी करावा

अर्थव्यवस्थेतील संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक खर्च कमी करावा, असे वारंवार आर्थिक तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्यामुळे सोन्याची मोठ्या प्रमाणातील खरेदी, इंधनाचा अतिरिक्त वापर आणि परदेशी प्रवास यांसारख्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित केली जाते.

एकंदरीत, सध्याची परिस्थिती ही बाजारातील अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय घटकांमुळे निर्माण झालेली असून पुढील काही दिवस दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts