Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • परभणी जिल्ह्याची बंडखोरीची परंपरा, बंडखोरांचा सूत्रधार, परभणीचा खासदार
राजकारण

परभणी जिल्ह्याची बंडखोरीची परंपरा, बंडखोरांचा सूत्रधार, परभणीचा खासदार

Parbhani District's Tradition of Rebellion

Parbhani District’s Tradition of Rebellion : परभणी जिल्हा (Parbhani Shivsena) हा मराठवाड्यातील शिवसेनेचा प्रमुख बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, या जिल्ह्याची आणखीन एक ओळख आहे, ती म्हणजे बंडखोरीची. मोठ्या कालखंडानंतर का? होईना मात्र परभणी जिल्ह्याने बंडखोरीची आपली परंपरा (Tradition of Rebellion) कायम ठेवली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व गाजविणार्‍या शिवसेनेस खासदारांच्या बंडखोरीचे (Rebellion by Shivsena MP) लागलेले ग्रहण ३७ वर्षाच्या दीर्घ कालखंडानंतरसुध्दा विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या रुपाने कायम राहीले आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे यावेळी बंडखोरीचे नेतृत्त्वच परभणी जिल्ह्याकडे आहे. ठाकरे शिवसेनेतील फुटर गटातील ६ खासदारांचे नेतृत्त्व स्वतः परभणीचे खासदार संजय जाधव (Rebel Sanjay Jadhav) आहेत हे तिथेल मतदारांचे दुर्भाग्य म्हणावे लागले.

या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने पहिल्यांदा १९८९ ला व त्या पाठोपाठ १९९१ च्या निवडणूकीतच माजी खासदार कै. अशोक देशमुख यांच्या रुपाने दोन वेळेस प्रखर व ज्वलंत मुद्यावरच प्रचंड असे यश पटकावून पक्षास अधिकृत मान्यतासुध्दा मिळवली. परंतु, १९९३ च्या सुमारास तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नृसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसजणांचे सरकार वाचविण्यात देशमुख यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेऊन बंडखोरी कली. त्यामुळेच शिवसेनेने १९९६ व १९९८ च्या लोकसभा निवडणूकीत सर्वसामान्य कार्यकर्ता असणार्‍या अ‍ॅड. सुरेश जाधव यांना उमेदवारी बहाल केली.

हेही वाचा – ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? 9 पैकी 6 खासदारांनी का सोडली ठाकरेंची साथ; जाणून घ्या यामागचे कारण

Parbhani’s Tradition of Rebellion : परभणी जिल्हा : खासदार संजय जाधवांच्या वडिलांनीही केली होती बंडखोरी

प्रखर व ज्लवंत हिंदुत्वाच्या मुद्यावरच ते एकदा नव्हे दोनदा लोकसभेवर पोहोचले होते. परंतु, अ‍ॅड. सुरेश जाधव यांना स्थानिक पातळीवरील काही प्रकरणे भोवली. त्यामुळेच त्यांच्याऐवजी इतरांना उमेदवारी बहाल करण्याच्या हालचाली श्रेष्ठींनी सुरु केल्याबरोबर अ‍ॅड. सुरेश जाधव यांनी बंडखोरी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना गाठली. तत्कालीन विद्यमान आमदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील हे २००४च्या निवडणूकीतूनसुध्दा प्रखर व ज्वलंत हिंदुत्वाच्या मुद्यावर लोकसभेवर पोहोचले.

Parbhani’s Tradition of Rebellion :  ज्यांना शिवसेनेने खासदार केले ते बंडखोर निघाले

परंतु, तत्कालीन आमदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या विरोधात तक्रारींचा सुर आळवून अ‍ॅड.तुकाराम रेंगे यांनी शिवसेना श्रेष्ठींपासून दुरावा राखून बंडखोरीचा पावित्रा स्विकारला अन् ते काँग्रेसवासी झाले. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अ‍ॅड. गणेशराव दुधगांवकर यांना शिवसेना श्रेष्ठींनी २००९ च्या निवडणूकीतून प्रचंड बहुमताने प्रखर व ज्वलंत हिंदुत्वाच्या मुद्यावर लोकसभेवर पोहचवले. दुर्देव असे अ‍ॅड. दुधगांवकर यांनी २०१४च्या निवडणूकीपुर्वीच पक्षश्रेष्ठींच्या विरोधात नाराजीचा सूर आळवून टिका टिप्पणीकरीत शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा फडकवला. त्याचा परिणाम तत्कालीन आमदार संजय जाधव यांना खासदारकीची लॉटरी लागली.

हेही वाचा – बैठकीआधीच राजकीय स्फोट; राऊतांचा इशारा…”पक्ष तोडाल तर आम्ही तुम्हाला तोडू!”

Parbhani’s Tradition of Rebellion  : २ वेळा आमदार ३ वेळा खासदार तरीही बंडखोरी

त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत जाधव हे दोन वेळेस प्रखर व ज्वलंत हिंदुत्वाच्या मुद्यावर लोकसभेवर पोहोचले. परंतु, शिवसेनेंतर्गतच बंडाळीच्या पार्श्‍वभूमीवर जाधव यांनी ठाकरे कुटूंबियांबरोबर निष्ठा व्यक्त करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. २०२४ च्या निवडणूकीत शिवसेना उबाठा गटाच्या मशाल या निवडणूक चिन्हावर जाधव यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भक्कम सहकार्याने धर्मनिरपेक्ष मतांच्या बळावरच लोकसभेत हॅट्रीक साधली.

Parbhani’s Tradition of Rebellion : : बंडखोरांचा सूत्रधार परभणीचा खासदार…

राज्यस्तरावरील राजकीय स्थित्यंतराच्या पार्श्‍वभूमीवर जाधव यांनी शिवसेना उबाठा गटाबरोबरच वारंवार निष्ठा व्यक्त करीत बंडखोरी आपल्या रक्तात नाही, त्या मालिकेत आपण बसणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा जाहीर केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत, र्‍हदयस्थान व प्रेरणास्थान आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आपण कदापिही बंड करणार नाही, शेवटच्या श्‍वासापर्यंत शिवसेनेत राहु, असा दावा करणार्‍या खासदार जाधव यांनी अलिकडील राजकीय स्थित्यंतराच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना शिंदे गटाबरोबर सलगी करण्यास सुरुवात केली. अन् बुधवारी अपेक्षेप्रमाणे बंडाचा झेंडा फडकवून परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेस लागलेल्या बंडखोरीची मालिका कायम राखली आहे.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत जाधव हे दोन वेळेस प्रखर व ज्वलंत हिंदुत्वाच्या मुद्यावर लोकसभेवर पोहोचले. परंतु, शिवसेनेंतर्गतच बंडाळीच्या पार्श्‍वभूमीवर जाधव यांनी ठाकरे कुटूंबियांबरोबर निष्ठा व्यक्त करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. २०२४ च्या निवडणूकीत शिवसेना उबाठा गटाच्या मशाल या निवडणूक चिन्हावर जाधव यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भक्कम सहकार्याने धर्मनिरपेक्ष मतांच्या बळावरच लोकसभेत हॅट्रीक साधली. आणि संजय जाधव पुन्हा २०२४ मध्ये लोकसभेवर निवडणून आले . मात्र, त्यांनी आपल्या जिल्ह्याची बंडखोरीची परंपरा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts