Eknath Shinde Name Missing from Invitation Sparks Controversy: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रण पात्रिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आरोग्य सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या नियंत्रण पत्रिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेविरोधात आक्रमण भूमिका घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेच्या या कार्यक्रमात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र नियंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. याचा निषेध म्हणून शिवसेनेने थेट महापालिका मुख्यालय गाठत आंदोलन केले.
हेही वाचा: केंद्रीय लोकसेवा आयोगात 500 हुन अधिक पदांसाठी मोठी भरती जाहीर; वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख
शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते महापालिका मुख्यालयात पोहोचले. त्यांनी सचिव दालनात घेराव घालत जोरदार निषेध नोंदवला. तसेच महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला.
कार्यकर्त्यांचा आरोप
कार्यकर्त्यांनी आरोप केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही त्यांच्या नावाचा समावेश न करणे हे गंभीर दुर्लक्ष असून याला राजकीय अर्थ लावला जात आहे. तसेच अशा प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.












