Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • केंद्रीय लोकसेवा आयोगात 500 हुन अधिक पदांसाठी मोठी भरती जाहीर; वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख
Top News

केंद्रीय लोकसेवा आयोगात 500 हुन अधिक पदांसाठी मोठी भरती जाहीर; वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख

UPSC Recruitment 2026

UPSC Recruitment 2026: केंद्रीय लोकसेवा अयोग (UPSC) मार्फत ५०० हुन अधिक पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

राज्यात हजारो विद्यार्थी UPSC परीक्षेची तयारी करतात. जर तुम्हीही या परीक्षेची तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली असून, पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.

या भरतीअंतर्गत 500 पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार असून, देशभरातील पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यात ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, असिस्टंट इंजिनिअर, सायंटिस्ट, प्रोफेसर आणि इतर अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया 13 जूनपासून सुरू झाली असून 03 जुलै 2026 ही शेवटची तारीख आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचून दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी UPSC PDF डाउनलोड करू शकतात.

हेही वाचा: शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य; कुणबी नोंदी, आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवर स्पष्ट भूमिका

पदांची अधिक माहिती

ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर
असिस्टंट इंजिनिअर
सायंटिस्ट
प्रोफेसर
एअर सेफ्टी ऑफिसर
ऑपरेशन्स ऑफिसर
इतर संबंधित पदे

शैक्षिणक पात्रता

या पदांसाठी उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
B.E / B.Tech / M.E / M.Tech
M.Sc / MCA / LLB / MBBS
पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी
संबंधित क्षेत्रातील अनुभव (पदानुसार आवश्यक)

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय पदानुसार 30, 35, 40 किंवा 50 वर्षांपर्यंत असावे. वयोमर्यादा गणनेची अंतिम तारीख 03 जुलै 2026 आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

अर्ज शुल्क

सामान्य / OBC / EWS: ₹25/-
SC / ST / PwD / महिला: शुल्क नाही

अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांनी https://www.upsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts