Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुन्हा मनोरंजन विश्वाला धक्का! ‘द रिंग’ आणि ‘लिलो अँड स्टिच’ फेम अभिनेत्री डेव्ही चेसचे ३५ व्या वर्षी निधन
मनोरंजन

पुन्हा मनोरंजन विश्वाला धक्का! ‘द रिंग’ आणि ‘लिलो अँड स्टिच’ फेम अभिनेत्री डेव्ही चेसचे ३५ व्या वर्षी निधन

Daveigh Chase Death
Daveigh Chase Death: मनोरंजन विश्वाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. नुकतेच १४ जून रोजी अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनाची घटना ताजी असतानाच, ‘द रिंग’ फेम अभिनेत्री डेव्ही चेस हिने काल अखेरचा श्वास घेतला.
हॉलिवूडमधून एक दू:खद बातमी समोर आली आहे. ‘ द रिंग’ आणि ‘लिलो अँड स्टिच’मधील भूमिकांमुळे जगभरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री डेव्ही चेस (Daveigh Chase) हिचे वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या अकाली जाण्याने चाहत्यांसह मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? 9 पैकी 6 खासदारांनी का सोडली ठाकरेंची साथ; जाणून घ्या यामागचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, डेव्ही चेस गेल्या काही काळापासून गंभीर आरोग्य समस्यांशी झुंज देत होती. तिला मेनिन्जायटिस आणि रक्तातील संसर्गाचा त्रास होता. या संसर्गाचे पुढे सेप्सिसमध्ये रूपांतर झाल्याने तिची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनाची माहिती जवळच्या व्यक्तींनी दिली आहे.

बालकलाकार ते लोकप्रिय अभिनेत्री

२४ जुलै १९९० रोजी लास वेगास येथे जन्मलेल्या डेव्ही चेसने लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तिने डिस्नेच्या लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपट Lilo & Stitch मधील ‘लिलो’ या पात्राला आवाज दिला होता. त्याचबरोबर The Ring या सुपरहिट हॉरर चित्रपटातील ‘समारा मॉर्गन’ ही भूमिका तिच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेली भूमिका ठरली.

अनेक गाजलेल्या प्रकल्पांचा भाग

अभिनयासोबतच डेव्हीने व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही मोठी ओळख निर्माण केली. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि अॅनिमेशन प्रकल्पांमधील तिच्या कामाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले होते. तिच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहते आणि सहकलाकारांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी एका गुणी कलाकाराचा झालेला मृत्यू हा मनोरंजन क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts