Parenting Tips: मुलं सतत रागावतात, हट्ट करतात किंवा पालकांचं ऐकत नाहीत, अशी तक्रार अनेक घरांमध्ये ऐकायला मिळते. मात्र, यामागे मुलांइतक्याच प्रमाणात पालकांचा काही सवयीही कारणीभूत असू शकतात.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टॅब आणि टीव्ही यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासावरही होताना दिसतो. सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होते, तसेच त्यांची सहनशीलता देखील घटते. पूर्वी मुलं खेळ, गोष्टी, मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यात रमायची, पण आता त्या जागी स्क्रीनने घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक वाढीवर आणि सामाजिक कौशल्यांवरही परिणाम होत आहे.
पालक अनेकदा व्यस्त दिनचर्येमुळे मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. अशा वेळी मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी मोबाईल हा सोपा पर्याय वाटतो. मात्र, ही सवय पुढे मोठी समस्या निर्माण करू शकते. (Parenting Tips) मुलांना प्रत्येक वेळी त्वरित समाधान मिळण्याची सवय लागते. त्यामुळे संयम, वाट पाहण्याची सवय आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते.
मुलांच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे (Controlling children’s screen time)
याशिवाय, मुलं जे पाहतात त्याचा त्यांच्या वागणुकीवर थेट परिणाम होतो. आक्रमक किंवा अतिउत्तेजित करणारा कंटेंट पाहिल्यास मुलं तशीच प्रतिक्रिया देऊ लागतात. ((Parenting Tips) त्यामुळे त्यांचा राग लवकर (kids anger control) अनावर होतो, ते हट्टी बनतात आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड (angry child behavior) करतात. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
मुलांना वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये गुंतवणे हे महत्त्वाचे ठरते. गोष्टी सांगणे, चित्रकला, वाचन किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे यामुळे मुलांचा मानसिक विकास अधिक चांगला होतो. तसेच, पालकांनी स्वतःही मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून मुलांसमोर योग्य उदाहरण ठेवणे आवश्यक आहे.
शेवटी, मुलांच्या वागणुकीत होणारे बदल समजून घेणे आणि त्यावर योग्य वेळी उपाय करणे ही पालकांची जबाबदारी आहे. थोडासा संयम, योग्य मार्गदर्शन आणि प्रेमळ संवाद यामुळे मुलांच्या सवयी सकारात्मक दिशेने बदलू शकतात.
हेही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? 9 पैकी 6 खासदारांनी का सोडली ठाकरेंची साथ; जाणून घ्या यामागचे कारण
पालकांनो आपल्या स्वतःच्या वागणुकीवर लक्ष द्या
मुलं रागात (kids anger control) बोले म्हणून आपणही रागात उत्तर देणे टाळावे. अनेक पालकांच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे की, जेव्हा ते शांतपणे संवाद साधू लागले, तेव्हा त्यांच्या मुलांच्या वागणुकीत सकारात्मक बदल दिसून आले.
मुले घरातील वातावरण आणि मोठ्यांचे वर्तन पाहूनच अनेक गोष्टी शिकतात. त्यामुळे घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणे महत्त्वाचे आहे.
Parenting Tips: मुलांचे म्हणणे ऐकून घ्या
मुलांसाठी वेळ काढा
धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकदा पालकांना मुलांसोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. मात्र, मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी त्यांच्यासोबत संवाद साधणे तितकेच महत्त्वाचे असते. मुलांशी गप्पा मारा, त्यांच्या आवडी जाणून घ्या आणि त्यांच्यासोबत विविध खेळ किंवा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. यामुळे मुलांना आपलेपणाची भावना मिळते आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. त्याचबरोबर नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची उत्सुकताही कायम राहते.
kids anger control: राग नियंत्रणाच्या सवयी शिकवा
शारीरिक हालचालींना प्रोत्साहन द्या
तज्ज्ञांप्रमाणेच अनेक पालकांचे मत आहे की, शारीरिक हालचाली आणि खेळ मुलांचा राग कमी करण्यास मदत करतात. धावणे, सायकल चालवणे, फुटबॉल खेळणे किंवा इतर कोणतीही सक्रिय शारीरिक क्रिया मुलांमधील अतिरिक्त ऊर्जा आणि तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरते. यामुळे त्यांचा मूड सुधारतो आणि राग हळूहळू कमी होण्यास मदत होते.










