Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • घुलेच्या मित्राने केला अत्याचार अन् विलासने शिवीगाळ करत ‘संबंध न ठेवल्यास…’ महिलेचा खळबळजनक दावा
ताज्या बातम्या

घुलेच्या मित्राने केला अत्याचार अन् विलासने शिवीगाळ करत ‘संबंध न ठेवल्यास…’ महिलेचा खळबळजनक दावा

Beed Vilas Ghule Case

Beed Vilas Ghule Case: बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटनांनी हादरलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता विलास घुले प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी गावामध्ये विलास घुलेची हत्या करण्यात आली. केवळ दुसऱ्याचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या विलास घुलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर आली. अन् या घटनेनंतर संपूर्ण केज तालुका आणि टाकळी गावात तीव्र संतापाची लाट उसळली.. संतप्त गावकऱ्यांनी अहिल्यानगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. पण याप्रकरणाला आता वेगळंच वळण लागताना दिसत आहे.

हेही वाचा: फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; मराठी नेता पंतप्रधान झाला तर…

या प्रकरणात खासदार पूत्र सौरभचे नाव समोर आले. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले होते. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले होते. या प्रकरणामुळे त्यांचे मंत्रीपद देखील गेले. आता घुले प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे चांगलेच अडचणीत सापडले आहे..या नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत असतानाच आता या प्रकरणात एक महिला समोर आली आहे.

ब्लॅकमेल करत अत्याचार

विलास घुलेचा मित्र उमेश मानेने व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत अत्याचार केला असं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. 3 तारखेला विलास घुले म्हणाला होता की, संबंध न ठेवल्यास तुझ्या लेकरांना किंवा तुझ्या नवऱ्याला मारून टाकू, यानंतर 20 तारखेला देखील घरासमोर येऊन हॉर्न मारून शिवीगाळ केली… त्याला समजावण्यासाठी माझे वडील, नवरा आणि नातेवाईक तेथे गेले होते. तेव्हा त्यांनी काचेच्या बॉटल आणि विटांनी मारहाण सुरू केली. त्यानंतर माझ्या वडिलांनी हात उचलला आणि यातून ही घटना घडली.

महिलेचा खळबळजनक दावा

रमेश घुलेने आम्हाला धमकावल्याने आम्ही आजपर्यंत पोलिसात गेलो नाही, पोलिसांनी माझी तक्रार घेऊन आम्हाला न्याय द्यावा. उमेश मानेने माझ्यासोबत बळजबरी केली, अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ केले. व्हिडिओ व्हायरल करीन असे म्हणून ब्लॅकमेल केले आणि पुन्हा अत्याचार केला. ही घटना मी घरच्यांना सांगितली, पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाणार होतो…रमेश घुलेने आम्हाला धमकावले, यापुढे असे होणार नाही याची जिम्मेदारी त्याने घेतली आणि जर तक्रार द्यायला गेलात तर तुमचं काही खरं नाही असं म्हणाला. आम्ही शेतात राहत होतो, त्यानंतर गावात राहायला गेलोत. त्यानंतरही उमेश माने आणि विलास घुले बुलेट आणि चार चाकी काळ्या स्कॉर्पिओने येऊन त्रास द्यायचे, असंंही महिलेने म्हटले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts