Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Top News
  • वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात बदल; जाणून घ्या प्रस्थानाची तारीख, वेळापत्रक आणि नवे नियम
ताज्या बातम्या

वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात बदल; जाणून घ्या प्रस्थानाची तारीख, वेळापत्रक आणि नवे नियम

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026: राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने वाहतुकीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आळंदीतील वाढत्या पाणीपातळी आणि सुरक्षेच्या कारणास्तव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यातही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026) पार्श्वभूमीवर आळंदी येथे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमुळे यंदाच्या प्रस्थान सोहळ्याच्या आयोजनात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आळंदीतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांना कमिटीने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: पुण्यातील 101 महापालिका शाळांना अचानक सुट्टी; कारण जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026) बुधवार, ८ जुलै रोजी आळंदी येथे पार पडणार आहे. मात्र, यंदा मुसळधार पाऊस आणि इंद्रायणी नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संस्थानकडून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात आहे.

प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026)

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची संस्था कमी करण्यात आली आहे. मनाच्या ५६ दिंड्यांमधून प्रत्येक दिंडीतील केवळ १० वारकऱ्यांनाचा मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे.

मोठ्या गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेल प्राधान्य मिळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

समाधी मंदिरातील दर्शन बंद राहणार

यंदाच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान संत ज्ञानेश्वर महराज समाधी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026) मंदिरातील नियमित दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात केवळ निवडक वारकरी आणि संबंधित मान्यवरांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीवर लक्ष

आळंदी परिसरातील इंद्रायणी नदीची पाणीपातळी सध्या प्रशासनाच्या निरीक्षणाखाली आहे. नदीची पाणीपातळी कमी झाली नाही किंवा परिस्थिती धोकादायक राहिली तर पालखीच्या मार्गात आवश्यक बदल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुरक्षिततेला प्राधान्य (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026)

पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. मात्र यंदा पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन संस्थान आणि प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलली जात आहेत.

वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts