Breaking News :
  • Home
  • Top News
  • मेडिकल PG करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! AIIMS INI-CET 2027 ची नोंदणी सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
एजुकेशन- जॉब

मेडिकल PG करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! AIIMS INI-CET 2027 ची नोंदणी सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

AIIMS INI-CET January 2027 Registration
3
AIIMS INI-CET January 2027 Registration: मेडिकल क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्लीने INI-CET जानेवारी 2027 सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. MD, MS, MCh, DM आणि MDS यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांना आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या परीक्षेच्या माध्यमातून AIIMS नवी दिल्लीसह देशातील विविध Institute of National Importance मध्ये पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश (AIIMS INI-CET January 2027 Registration) दिला जातो. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासणे आवश्यक आहे.

अर्जाची अंतिम तारीख कोणती?

INI-CET जानेवारी 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (AIIMS PG entrance exam) सुरू झाली असून उमेदवारांना 13 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज भरल्यानंतर 17 ते 19 ऑक्टोबरदरम्यान उमेदवारांना आपल्या फॉर्मचा स्टेटस तपासता येईल.

त्यानंतर अंतिम नोंदणी स्थिती आणि अॅडमिट कार्ड 26 ऑक्टोबर 2026 रोजी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

1 नोव्हेंबरला होणार परीक्षा

INI-CET जानेवारी 2027 परीक्षा 1 नोव्हेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा संगणकावर आधारित चाचणी म्हणजेच CBT मोडमध्ये होईल.

परीक्षेतील कामगिरीच्या आधारे संबंधित संस्थांमधील विविध PG मेडिकल आणि डेंटल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.

3 तासांत सोडवावे लागतील 200 प्रश्न

परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 200 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील. पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना 180 मिनिटे म्हणजेच 3 तास दिले जातील.

प्रत्येक योग्य उत्तरासाठी एक गुण मिळेल. मात्र चुकीच्या उत्तरासाठी एक-तृतीयांश गुण वजा केले जातील. एखादा प्रश्न सोडल्यास त्यासाठी गुण मिळणार नाहीत किंवा निगेटिव्ह मार्किंगही होणार नाही.

अर्जासाठी किती शुल्क?

उमेदवारांच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

General आणि OBC उमेदवार: 4,000 रुपये
SC, ST आणि EWS उमेदवार: 3,200 रुपये

अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी AIIMSच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन INI-CET जानेवारी 2027 साठी उपलब्ध असलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर आवश्यक वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर माहिती अचूकपणे भरावी.

यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि छायाचित्रासह मागितलेल्या इमेज अपलोड कराव्यात. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरल्यानंतर फॉर्म अंतिम स्वरूपात सबमिट करावा.

अर्ज सबमिट केल्यानंतर मिळणारे Confirmation Page डाउनलोड करून जतन करून ठेवावे. भविष्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी हे कागदपत्र उपयोगी ठरू शकते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts