अमोल धर्माधिकारी | Pune Westin Beuro Head
Vikram Kakade Shooting : आमदार विक्रम काकडे पुन्हा नेमबाजीच्या मैदानात, नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत होणार सहभागी.
नेमबाजी हा विक्रम काकडे यांचा जुना आणि अत्यंत आवडीचा खेळ आहे. पूर्वी त्यांनी नियमितपणे नेमबाजीचा सराव केला होता. मात्र विविध जबाबदाऱ्यांमुळे काही काळ या खेळापासून दूर राहिल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा बंदूक हाती घेत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा : तुकाराम मुंढेंना संजय राऊतांचं पत्र! FDA अधिकाऱ्यांचं ‘रेट कार्ड’ ₹2 लाखांपर्यंत?
आमदार विक्रम काकडे पुन्हा नेमबाजीच्या मैदानात ( Vikram Kakade Shooting )
नुकतीच त्यांनी टेंभुर्णी येथील माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज यशवंत शिंदे यांच्या जागतिक दर्जाच्या ट्रॅप आणि स्कीट नेमबाजी केंद्राला भेट दिली. यावेळी संजय मामा शिंदे यांनी त्यांचे अतिशय आपुलकीने स्वागत केले. या भेटीदरम्यान काकडे यांनी नेमबाजीचा सरावही केला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले.
“नेमबाजी हा माझ्यासाठी केवळ खेळ नाही, तर अनेक वर्षांपासून जपलेली आवड आहे. काही काळ त्यापासून दूर होतो, पण आता पुन्हा पूर्ण तयारीने सराव सुरू केला आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच माझी ही जुनी आवड पुन्हा जोपासण्याचा प्रयत्न आहे,” असे विक्रम काकडे यांनी सांगितले. राष्ट्रीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काकडे यांनी आता नियमित सरावाला सुरुवात केली असून येत्या काही आठवड्यांत त्यांच्या सरावाची तीव्रता वाढविण्यात येणार आहे.









