MPSC Protest Pune: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने परीक्षेतील पारदर्शकतेवर भर दिला. विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. चला तर जाणून घेऊयात नेमकं काय म्हणाले.
MPSC परीक्षांच्या पारदर्शकतेचा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा मुद्दा पुन्हा न्यायालयात पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या MPSC Recruitment आंदोलनाच्या अधिकाराबाबत महत्वाची निरीक्षणे नोंदवली.
पुण्यात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी (MPSC Student Protest) मोठ्या संघर्षातून आपले करिअर घडवत असतात. त्यामुळे केवळ आंदोलन करत आहेत म्हणून त्यांच्याकडे समाजकंटक म्हणून पाहता येणार नाही, असे निरीक्षण मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी यांनी सुनावणीदरम्यान नोंदवले. MPSC Latest News
विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार
MPSC भरती प्रक्रियेत काही त्रुटी किंवा गैरप्रकार झाल्याची विद्यार्थ्यांना शंका असल्यास त्याविरोधात आवाज उठवण्याचा त्यांना अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. Pune Latest News
पुण्यातील अमित सुपेकर आणि सौरभ विरकर यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात (MPSC Protest 2026) न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागील परिस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची हौस आहे, असे गृहीत धरता येणार नाही. स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी आपली भूमिका मांडणे स्वाभाविक असल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले.
हेही वाचा: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची पुन्हा चर्चा; सुरुवातीची लक्षणं कोणती अन् भारतासाठी किती धोका?
विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल का केले नाहीत?
सुनावणीदरम्यान विद्यार्थ्यांवर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याबाबतही चर्चा झाली.
विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि करिअर लक्षात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत, अशी भूमिका सरकारी वकिलांकडून न्यायालयासमोर मांडण्यात आली.
त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखतानाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे या सुनावणीतून समोर आले.
MPSC परीक्षा पारदर्शक असावी
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता (Bombay High Court MPSC) अत्यंत महत्त्वाची आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. MPSCसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा व्यवस्थेवरील विश्वास कायम राहणे गरजेचे आहे.
पुण्यात मुलांना शिक्षणासाठी पाठवणाऱ्या पालकांच्या अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
भरती प्रक्रियेशी संबंधित कोणताही निर्णय घेताना तो स्पष्ट आणि पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडला गेला पाहिजे, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे
न्यायालयाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचाही सल्ला दिला.
स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेतात. त्यामुळे आंदोलन किंवा अन्य कारणांमुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, अशी भूमिका न्यायालयाने व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी सरकार आणि संबंधित यंत्रणांची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा योग्य पद्धतीने विचार करून त्यावर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले.
हेही वाचा: एक आंदोलन, अनेक प्रश्न… राहुल गांधींच्या रणनीतीने दिल्लीतील राजकारण तापलं; पुढचा डाव कोणता?
पुण्याची ‘शिक्षणनगरी’ ही ओळख कायम राहावी
पुण्याची ओळख शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून आहे. देशभरातून विद्यार्थी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येतात.
ही ओळख आंदोलनांचे केंद्र म्हणून बदलू नये, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली. शहरातील वातावरणामुळे पालकांच्या मनात मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवण्याबाबत प्रश्न निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले.
काही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले
दरम्यान, सुनावणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या एका गटाने आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप सुरू असल्याचे समोर आले आहे.
MPSC परीक्षांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या मागण्या, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शासनाकडून होणारी कार्यवाही याकडे आता लक्ष लागले आहे.









