• Home
  • ताज्या बातम्या
  • मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचा आरोप; ऑडिओ क्लिपबाबत काय म्हणाले?
राजकारण

मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचा आरोप; ऑडिओ क्लिपबाबत काय म्हणाले?

Manoj Jarange 500 Crore
7

Manoj Jarange 500 Crore : ‘जशाला तसं उत्तर मिळणार…… हा थेट इशारा दिलाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी… आणि तोही थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना… बीडच्या नारायण गडावर मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटींचा मोठा खुलासा केलाय, ज्यामुळे शिंदे गटात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. माझं नाव सांगून शिंदेंनी दिल्लीतून ५०० कोटी रुपये आणले आणि मनोज जरांगेंना दिले असं शिंदे दिल्लीत म्हटले आहेत… असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय, एवढंच नाही, तर माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे आणि ती जर मी बाहेर काढली, तर शिंदेंच्या पायाखालची जमीन सरकेल… असा इशारा जरांगेंनी दिलाय. नक्की काय आहे हा ५०० कोटींचा प्रकार? दिल्लीतून शिंदेंनी जरांगेंच्या नावावर 500 कोटी आणलेत का ? आणि नसेल तर शिंदे यावर उत्तर देणार का ? जरांगेंच्या हातात शिंदेंची कोणती मोठी नस सापडली आहे? काय आहे यामागचं सत्य?

मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचा आरोप ( Manoj Jarange 500 Crore )

मनोज जरांगे पाटलांनी शिंदेंवर केलेल्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. जरांगे पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी दिल्लीत भाजप नेत्यांना सांगितलं की ‘मी जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये दिले आहेत’. जरांगेंचा सवाल आहे, जर मला ५०० कोटी दिले असतील, तर उद्या संध्याकाळपर्यंत त्याचा पुरावा जनतेसमोर मांडा… एकनाथ शिंदेंनी दिल्लीत, भाजपच्या नेत्यांकडे सांगितलं की मी जरांगेंना ५०० कोटी दिलेत. मी आव्हान देतो, जर दिले असतील तर उद्यापर्यंत पुरावे द्या. माझं नाव सांगून दिल्लीतून पैसे आणले का? एकनाथ शिंदेंनी पैसे घेतले आणि श्रीकांत शिंदेंनी मला दिले, अशी चर्चा घडवून आणली जातेय. पण माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे. जर मी ती पुरावे दाखवले ना, तर शिंदेंच्या पायाखालची जमीन सरकेल! जशाला तसं उत्तर मिळणार आता….

मेळाव्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाच्या बीडच्या नेत्यांनी इशारा दिला होता की, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. पण जरांगे पाटील आज अधिकच आक्रमक झालेले दिसले. त्यांच्या हातात नक्की काय आहे, ज्याच्या जोरावर ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देत आहेत? जरांगे पाटील सूचकपणे ज्या ऑडिओ क्लिपबद्दल बोलत आहेत, त्यात सरकारमधील काही वरिष्ठ व्यक्तींच्या संभाषणाचा किंवा मध्यस्थांसोबत झालेल्या देवाणघेवाणीचा रेकॉर्ड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगेंचा आरोप आहे की, शिंदेंनी मराठा आंदोलन मोडीत काढण्यासाठी एकापाठोपाठ एक अनेक षडयंत्रे रचली. मात्र, आता पाणी डोक्यावरून गेलंय आणि म्हणूनच हे पुरावे बाहेर काढण्याचा इशारा जरांगेंनी दसरा मेळाव्यातून दिला आहे.

हेही वाचा : हरिश्चंद्रगडावर तरुणाचा मृतदेह शोधताना दुसरा सांगाडा सापडला; नेमकं काय घडलं?

५०० कोटींच्या दाव्याचा पुरावा सादर करण्याचे जरांगेंचे आव्हान

एकीकडे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असताना, आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रतिक्रिकेकडे लागले आहेत. शिंदेंनी जरांगेंच्या विरोधात अनेक गुप्त रणनीती आखल्याचा आरोप जरांगे वारंवार करत आले आहेत. मी मराठा समाजाचा माणूस आहे, मी फसवत नाही असं सांगणारे मुख्यमंत्री शिंदे, जरांगेंच्या या ५०० कोटींच्या आरोपाला आणि ऑडिओ क्लिपच्या धमकीला कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे गट या आरोपांना केवळ राजकीय अफवा म्हणून फेटाळून लावतो की यावर कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मराठा आरक्षणाची लढाई आता केवळ हक्काची राहिलेली नाही, तर ती पुराव्यांची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. जर उद्यापर्यंत पुरावे आले नाहीत, किंवा शिंदेंनी यावर मौन सोडलं नाही, तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद महायुतीला आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसवू शकतो. काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंच्या या आरोपांना चोख उत्तर देणार? की जरांगे पाटील खरोखरच ती ऑडिओ क्लिप सार्वजनिक करून राजकीय भूकंप घडवणार? याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts