Alka Kubal Son-in-law : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांच्या धाकट्या मुलीचा नुकताच साखरपुडा पार पडला. कस्तुरी आठल्ये हिने संकेत दुधाळसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असून, तिच्या होणाऱ्या पतीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. नव्वदीच्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी आई, बहीण अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. आजही त्या मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. मात्र, त्यांच्या दोन्ही मुलींनी अभिनयक्षेत्रापेक्षा(Acting Career) वेगळ्या करिअरची निवड केली आहे. त्यांची मोठी मुलगी ईशानी वैमानिक असून धाकटी मुलगी कस्तुरी वैद्यकीय क्षेत्रात आहे.
कस्तुरी आठल्येचा संकेत दुधाळसोबत साखरपुडा
अलका कुबल यांच्या धाकट्या मुलीचा काही दिवसांपूर्वी संकेत दुधाळ (Sanket Dudhal) याच्यासोबत साखरपुडा पार पडला. या खास सोहळ्यातील काही फोटो अलका कुबल यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्यांनी दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत प्रेमळ संदेशही लिहिला आहे.
‘तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम. असेच कायम एकत्र रहा आणि आनंदी रहा’, (Engagement Ceremony)अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टवर चाहत्यांनी आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कस्तुरीच्या नव्या आयुष्याबद्दल आनंद व्यक्त करत अनेकांनी तिला शुभाशीर्वाद दिले आहेत.
कोण आहे अलका कुबल यांचा होणारा जावई?
अलका कुबल यांच्या मोठ्या मुलीचा विवाह २०२२ मध्ये पार पडला होता. आता धाकटी मुलगी कस्तुरी आठल्ये हिच्या साखरपुड्यानंतर कुटुंबात लग्नाची लगबग सुरू झाली आहे. कस्तुरीचा साखरपुडा संकेत दुधाळ याच्यासोबत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संकेत नेमका कोण आहे आणि तो काय करतो, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कस्तुरी आठल्ये हिने फिलिपिन्समध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच भारतात वैद्यकीय क्षेत्रात काम (Medical) करण्यासाठी आवश्यक असलेली एफएमजीई (FMGE) परीक्षा तिने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. दुसरीकडे, संकेत दुधाळ हा एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. मात्र, संकेतच्या नोकरीतील पदाविषयी किंवा व्यावसायिक पार्श्वभूमीविषयी सध्या अधिक तपशील समोर आलेले नाहीत. त्यामुळे अलका कुबल यांच्या होणाऱ्या जावयाविषयी जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता कायम आहे.
LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.








