Aamir Khan Wedding: आमिर खान यांचं काल ५ जुलै २०२६ रोजी तिसरं लग्न पार पडलं असून त्यांनी सर्वांसमोर गौरीचा हात हातात घेत प्रेमाची कबुली दिली. चला तर जाणून घेऊयात आमिरची तिसरी पत्नी कोण आहे.
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan Wedding) आणि जोडीदार गौरी स्प्रॅट यांचा काल ५ जुलै २०२६ रोजी तिसरं लग्न पार पडलं आहे. दोघांच्या कथित विवाहसोहळ्याचा दावा करणारा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यानंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा: अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर! केतननंतर त्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन…
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आमिर आणि गौरी पारंपरिक पद्धतीने विधी पार पाडताना, कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत आनंद साजरा करताना दिसत आहेत. एका क्षणी आमिर गौरीचा हात हातात घेत तिच्यावरील प्रेम व्यक्त करताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर जोडप्याला शुभेच्छा देणारी पोस्ट
दरम्यान, अनेकांनी सोशल मीडियावर या जोडप्याला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या संदेशात दोघांच्या नव्या आयुष्यासाठी आनंद, प्रेम आणि समृद्धीच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमिर सध्या पारंपरिक पोशाखात, तर गौरी आकर्षक पारंपरिक वेशात दिसत आहे. समारंभातील काही खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. यात अमीर खानचे पहिली रीना दत्ता आणि दुसरी किरण राव या दोघी देखील उपस्थित होते.
रीना दत्ता
आमिर खान यांची पहिली पत्नी रीना दत्ता असून त्यांचा विवाह १९८६ मध्ये झाला होता. या दाम्पत्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
किरण राव
त्यानंतर आमिर खान यांनी दिग्दर्शक-निर्माती किरण राव यांच्याशी २००५ मध्ये दुसरा विवाह केला. या दाम्पत्याला आझाद नावाचा मुलगा आहे. २०२१ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
गौरी स्प्रॅट
आता आमिर खान यांनी ५ जुलै २०२६ रोजी गौरी स्प्रॅट यांच्याशी तिसरा विवाह केला. गौरी यांचा हा दुसरा विवाह असून त्यांना पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.
गौरी या मूळच्या बेंगळुरूच्या असून व्यवसायाने फॅशन स्टायलिस्ट आणि फोटोग्राफर आहेत. त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतले आहे. सध्या त्या मुंबईतील ‘BBlunt’ या सलूनचे संचालन करतात तसेच आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्येही कार्यरत आहेत.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्यात सुमारे १३ ते १४ वर्षांचे वय अंतर आहे.







