Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • नोटबंदीनंतर ५०० च्या बनावट नोटांचा सुळसुळाट
Top News

नोटबंदीनंतर ५०० च्या बनावट नोटांचा सुळसुळाट

Counterfeit 500 rupee notes

fake ₹500 notes surge after demonetisation : नोटबंदीनंतर बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या ६ वर्षातील ही सर्वाधिक बनावट नोटींची नोंद आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच यंदा २०२५ वर्षात सर्वाधिक बनावट नोटा या ५०० रुपयांच्या असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचे एकूण प्रमाण हे ३७ टक्के असून ही चिंतेची बाब असल्याचे अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकिंग व्यवस्थेत ५.८८ कोटी रुपयांच्या १.१८ लाख बनावट ५०० रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४.२८ कोटी रूपयांच्या ८५ हजार ७११ बनावट नोटा आढळून आल्या आहेत. आरबीआय च्या २०२४-२५ या वार्षिक अहवालात, आरबीआयने २०२४-२५ मध्ये २०० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत १३.९ टक्क्यांनी वाढ झाल्याने नोंदवले आहे. २०२४-२५ मध्ये सापडलेल्या २०० रुपयांच्या बनावट नोटांची एकूण संख्या ६५.३२ रुपये होती, तर ५७.३४ लाख रुपयांच्या २८ हजार ६७२ बनावट नोटा होत्या, असे त्यात म्हटलं आहे.

हेही वाचा – Motorola edge 70 स्मार्टफोन भारतात लॉन्च; 23 डिसेंबर पासून ऑनलाईन ऑफलाईन होणार उपलब्ध

२००० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ

२०२४-२५ मध्ये १०, २०, ५० आणि रुपयांच्या बनावट नोटांमध्ये एकूण ३२.३ टक्क तर अनुक्रमे १४ टक्के, २१.८ टक्के आणि २३ टक्के वाढ झाली. २००० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ झाली आहे. २०२४-२५ मध्ये ८६.५२ टक्क्यांनी गट होऊन ती ३ हजार ५०८ झाली, तर २०२३-२४ मध्ये ही संख्या २६ हजार ३५ होती.

२०२३-२४ मधील २.२२ लाखांपेक्षा कमी आहे

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात बँकिंग व्यवस्थेत आढळून आलेल्या बनावट नोटांची एकूण संख्या २.१७ लाख होती, जी २०२३-२४ मधील २.२२ लाखांपेक्षा कमी आहे. एकूण बनावट भारतीय चलनी नोटांपैकी बहुतांश (95.3 टक्के) बँकांनी शोधून काढल्या, तर उर्वरित (4.7 टक्के) RBI ने शोधून काढल्या, असे वार्षिक अहवालात दिसून आले आहे.

बनावट नोटांची संख्या २ लाख २२ हजार ६३८ एवढी 

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये शोधून काढलेल्या एकूण बनावट नोटांची संख्या २ लाख २२ हजार ६३८ एवढी आहे. जी आर्थिक वर्ष २०२५ तुलनेत २ लाख १७ हजार ३९६ पर्यंत कमी झाली आहे. जे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत असलेला घटता कल दर्शवतो. २०० रूपयांच्या बनावट नोटांमध्ये वार्षिक १३.९ टक्क्यांनी वाढ होऊन त्यांची संख्या ३२ हजार ६०० झाली. दुसरीकडे १०० रुपयाच्या बनावट नोटांमध्ये वार्षिक जवळपास २३ टक्क्यांनी घट होऊन त्यांची संख्या ५१ हजार ६९ झाली.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts