• Home
  • महाराष्ट्र
  • इराण-इस्त्रायल युद्धाची झळ महाराष्ट्राला, सांगलीकरांना मिळाला मोठ्ठा धक्का, नेमकं घडलं काय?
Top News

इराण-इस्त्रायल युद्धाची झळ महाराष्ट्राला, सांगलीकरांना मिळाला मोठ्ठा धक्का, नेमकं घडलं काय?

iran israel

Iran-Israel War | इराण-इस्त्रायल (Iran-Israel) या देशांमधील युद्ध (War) चांगलंच पेटलं आहे. या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका अनेक देशांना मिळाला आहे. यामध्ये भारतालाही (India) या युद्धाचा जोरदार फटका बसला आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या युद्धामुळे द्राक्ष निर्यात (Grapes Export) विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा  – महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

इराण-इस्त्रायल देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यापार मार्गांचे निर्यातीचे चक्र थांबवण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. तर निर्माण झालेल्या या कठिण परिस्थितीमुळे सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरवर्षी सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते. सांगलीतून हजारो टन द्राक्षे कतार, UAE, सौदी अरेबिया या देशांमध्ये निर्यात होत असतात. पण, सद्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगलीतील द्राक्षांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. सद्या सांगलीतील कोल्ड स्टोअरेजमध्ये 350 कंटेनर द्राक्षे साठवली आहेत. त्यामुळे नवीन माल ठेवण्यासाठी जागा शिल्लक उरलेली नाहीये. तसेच 700 कंटेनर होतील, इतके द्राक्षे बागेतच आहेत, त्यामुळे जर वेळेत द्राक्षे काढली नाहीत तर ती खराब होण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts