Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सोने चांदीच्या दरात आठवड्यात मोठे उलटफेर,चांदी 13230 रुपयांनी महागली; सोन्याचे भाव किती?
ताज्या बातम्या

सोने चांदीच्या दरात आठवड्यात मोठे उलटफेर,चांदी 13230 रुपयांनी महागली; सोन्याचे भाव किती?

Gold jewellery displayed in a showroom as gold prices rise during the wedding season

Gold and silver price fluctuation : सोने आणि चांदीचे दर 2025 मध्ये वेगानं वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात घसरण देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीच्या दरानं पुन्हा एकदा विक्रमी टप्पा गाठला आहे.

सोने आणि चांदी महागली :

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. 21 नोव्हेंबरला 5 फेब्रुवारीच्या एक्सपायरीच्या वायद्याचे 24 कॅरेट सोन्याचा दर 125850 रुपये होता. 28 नोव्हेंबरला सोन्याचा दर 129599 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच सोन्याच्या दरात 3749 रुपयांची वाढ एमसीएक्सवर झाली.

देशांतर्गत बाजारातही तेजी :

देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दराचा विचार केल्यास इकडे देखील दरामध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. लग्नसराईनिमित्त सोन्याची मागणी वाढल्यानं सोने दरात वाढ झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएसनच्या वेबसाईटनुसार 21 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 123146 रुपये होता. तो 28 नोव्हेंबरला 126591 रुपये होता. म्हणजेच देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात 3445 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 123550 इतका आहे. 20 कॅरेट सोनं 112670 रुपयांना मिळतेय.

हे ही वाचा : 1 डिसेंबर पूर्वी करा हे काम; 1 डिसेंबर पासून नियमात होणार हे महत्वाचे 5 बदल

सोन्याच्या दरात मोठी वाढ :

सोन्याच्या दरात ज्या प्रमाणं वाढ होत आहे. त्याच प्रमाणं चांदीच्या दरात देखील वाढ आहेत. चांदीचा दर 28 नोव्हेंबरला 17484 रुपयांवर पोहोचला आहे. आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळाले. 21 नोव्हेंबरला एमसीएक्सवर एक किलो चांदीचा दर 157877 रुपये होते. त्यात 17607 रुपयांची वाढ झाली. तर, देशांतर्गत बाजारात चांदीचा दर 151129 रुपयांवरुन 164359 रुपये किलोवर पोहोचला आहे.म्हणजेच चांदीच्या दरात 13230 रुपयांची वाढ झाली आहे.

कारण काय :

दरम्यान, भारतात सोन्याचे दर वाढण्यामागं दोन कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे अमेरिकेच्या फेड रिझर्व्ह कडून व्याज दर कपातीची शक्यता वाढली आहे. त्याशिवाय भारतात लग्नसराईचा हंगाम सुरु होत असल्यानं सोनं आणि चांदीची मागणी वाढली आहे. परिणामी सोने आणि चांदीचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारात अनिश्चितता वाढते तेव्हा देखील गुंतणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सोन्याचे दर 31 डिसेंबर 2024 ला 75 हजारांवर होते. त्यामध्ये जवळपास 55 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts