Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • 49 व्या वर्षी हा अभिनेता बनणार बाबा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
ताज्या बातम्या

49 व्या वर्षी हा अभिनेता बनणार बाबा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

actor randeep hudda become father

Actor becomes father at 49 : मनोरंजन विश्वात कोणत्या न कोणत्या कारणाने कोणीतरी चर्चेत असतं. अशातच आता बॉलीवूड इंडस्ट्रीती जाट चित्रपटातील अभिनेता चर्चेत आला आहे. त्याचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तो 49 व्या वर्षी बाबा होणार आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया या लेखात.

सोशल मिडियावर पोस्ट करत दिली माहिती

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लाशराम हे लवकरच आईबाबा होणार आहेत. त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये दोघेही जंगलात बोनफायरसमोर बसलेले दिसत असून कॅमऱ्यात पाहून हसत पोझ देत आहे. या पोस्ट च्या कॅप्शन मध्ये त्यांनी “दोन वर्षांचं  प्रेम, साहस आणि आता… हा प्रवास अजून ‘वाइल्ड’ होणार आहे.” असे कॅप्शन देत ते दोघेही आई बाबा होणार असल्याची माहिती शेअर केली आहे.

चाहत्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्ट नंतर चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या कमेंट मध्ये अनेकांनी हार्ट, इव्हील आय चे सिम्बॉल टाकत आनंद व्यक्त केला असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

दोघांत आहे 10 वर्षाचे अंतर

अभिनेता रणदीप हुद्दा आणि त्यांची पत्नी लिन यांच्या वयात 10 वर्षाचे अंतर आहे. तर रणदीप 49 वर्षाचा आणि त्याची पत्नी लिन लाशराम 39 वर्षाच्या आहे. परंतु त्यांच्या नात्यात 10 वर्षाचे अंतर असूनही एकमेकांवरील प्रेम कायम आहे. त्यांचे 2 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आणि आता त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.

हे ही वाचा : सिद्धार्थ कियाराने केले आपल्या मुलीचे नाव रिवील; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ

या वर्षी झाले लग्न

रणदीप हुड्डा आणि लिन लाशराम यांनी 29 नोव्हेंबर 2023 रोजी मणिपूरच्या इम्फाळमध्ये मेतेई परंपरेनुसार लग्न केलं होतं. रणदीप आणि लिन यांची पहिली भेट नसीरुद्दीन शाह यांच्या मोटली या थिएटर ग्रुपमध्ये झाली.त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटोस सोशल मीडियावर शेअर केले होते. आता नवीन पाहुण्यांचे आगमन होणार असल्याने दोघेही प्रचंड खुश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts