Gold – Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. परंतु आता दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्याचे भाव तब्बल 4 हजार रुपयांनी घसरले आहेत. यासह चांदीच्या भावात देखील घट बघायला मिळाली. यामुळे यंदा दिवाळीत ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.
दिवाळीत सोने खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात येते. परंतु यंदा ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. यामुळे सोने खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांमध्ये नाराजीचे सूर बघायला मिळाले होते. परंतु दिवाळी पाडव्याला हे भाव उतरल्याने पुन्हा सोने खरेदी करता येईल.
काय आहे आजचा भाव
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे भाव 1 लाख 34 हजार 400 रुपये प्रति तोळा एवढे होते. हेच दर आज १ लाख 31 हजार 500 रुपयांवर येऊन थांबले आहे. एवढेच नाही तर चांदीचा भाव 8 हजार रुपयांनी घसरून 1 लाख 50 हजार रुपयांवर आलाय. बुलियन असोसिएशनच्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्या 1 लाख 28 हजार 40 रुपये प्रति 1 तोळा आहे. तर किलोमागे चांदी 1 लाख 50 हजार 50 रुपयांवर पोहोचली आहे.
View this post on Instagram
24 कॅरेट साठी मोजावे लागणार एवढे पैसे
24 कॅरेट सोन्यासाठी म्हणजे प्युअर गोल्ड साठी आताच्या घडीला 1 लाख 28 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम मोजावे लागतील . तर चांदी किलोमागे 1 लाख 50 हजार 50 रुपयांवर आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 1 लाख 17 हजार 370 रुपये तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 96 हजार 30 रुपयांवर आहे.
हे हि वाचा : Diwali Gold 2025 : गेल्या 15 दिवसात सोन्याच्या भावात 11 हजार रुपयांची वाढ, अजून किंमत वाढण्याची शक्यता
चांदीही आपटली
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 1 किलो चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरुन 1 लाख 50 हजार रुपयांवर आले आहे. हेच दर 20 ऑक्टोबरला आयबीजेएच्या वेबसाईटवर 11 हजार रुपयांनी घसरले होते. देश विदेशात सुरु असलेले युद्ध, आर्थिक मंदी आणि व्याजदरातील बदल यासारख्या अनेक जागतिक आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार बघायला मिळत आहे.